यवतमाळजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; पाच भाविकांचा जागीच मृत्यू - Yavatmal Accident News - YAVATMAL ACCIDENT NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 8:47 PM IST

यवतमाळ Yavatmal Accident News : नांदेड येथील गुरुद्वाराला (Gurudwara Nanded) दर्शनाकरीता जात असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारने धावत्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात पाच भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही अपघाताची गंभीर घटना सोमवारी नागपूर-तुळजापूर महामार्गावर चापर्डा, कळंब येथे घडली. मृतकांमध्ये चार पंजाब आणि कॅनडातील एका नागरीकांचा समावेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. तजेंद्र सिंग परवींदर सिंग (२२ ), भजन कौर (लोढा) (७०), बलवीर कौर (७३) सुरज सिह सहोटा (४५) सर्व रा.पंजाब तसेच वाहन चालक जसप्रित नहाल रा.कॅनडा अशी अपघातील मृतांची नावं आहेत. 

घटनास्थळीच मृत्यू : या दुर्दवी घटनेमध्ये पंजाबमधील तजेंद्र सिंग परवींदर सिंग, भजन कौर (लोढा), बलवीर कौर, सुरज सिंह सहोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक जसप्रित नहाल रा. कॅनडा हा गंभीर जखमी झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं जसप्रितला उपचारासाठी यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे, एपीआय दत्तात्रय वाघमारे राजु इरपाते, मंगेश ढबाले, गीरीश मडावी, नितीन कडुकर यांनी अपघात स्थळी धाव घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.