लग्नात खाण्यावरून हाणामारी, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, महिलांनाही मारहाण; पाहा VIDEO - अलिगढमध्ये लग्नात हाणामारी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 13, 2024, 10:44 AM IST
अलिगढ Fight In Wedding : लग्नसमारंभात जेवणावरून छोटे-मोठे वाद झाल्याच्या घटना काही नव्या नाहीत. साधारणत: असे वाद चर्चेनं सोडवले जातात. मात्र उत्तर प्रदेशातील अलिगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लग्न समारंभात नाश्त्यावरून वाद झाला. त्यानंतर नातेवाइकांमध्ये चक्क जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या आणि बेल्टनंही मारहाण झाली. कहर म्हणजे, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिलांनाही लाथांनी मारहाण करण्यात आली. या भांडणात वराच्या बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. नंतर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला. या प्रकरणी पोलिसांना कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. पाहा या घटनेचा हा धक्कादायक व्हिडिओ..