पुण्यात महिला अत्याचाराविरोधात जनजागृतीसाठी 'फॅशन शो', पाहा व्हिडिओ - VIOLENCE WOMEN AWARENESS CAMPAIGN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 10, 2024, 10:56 PM IST
पुणे : महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा, बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा. महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता ते थांबवण्यासाठी पुढाकार घ्या. मुली - महिलांचा आदर करायला मुलांना शिकवा, असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला. 'कशीश सोशल फाउंडेशन' आणि 'कशीश प्रोडक्शन'च्या वतीनं महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी 'स्काय गोल्ड मिस, मिसेस, मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट' 2024 सीझन 2 फॅशन शोचंं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशानं तसंच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला. "केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटना घडू नयेत, ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये महिला अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याचं काम करत आहोत," असं यावेळी पॅडमॅन योगेश पवार यांनी सांगितलं.