Electricity Price Hike : वीज दरवाढीचा छोट्या ग्राहकांवर परिणाम नाही : देवेंद्र फडणवीस - Lok Sabha Elections

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

नागपूर Electricity Price Hike : आजपासून राज्यात विजेच्या दरात वाढ झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढ झाल्यानं ग्राहकांना दरवाढीचा शॉक लागलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, "महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या संदर्भात जो निर्णय दिला त्यानुसार दरवाढ आहे. छोट्या माणसावर कुठलाही बोजा पडणार नाही. अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी (नामांकन) अर्ज दाखल करण्याची डेडलाईनसुद्धा अगदी जवळ आली आहे. या विषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बैठका कराव्या लागतात. त्याशिवाय सीट देखील फायनल करताच येत नाही. आता आम्ही जवळपास पोहोचलो असून मला वाटते लवकरच घोषणा करू. दुसऱ्या टप्प्याच जवळपास सर्व काही सुटले आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.