अक्षय्य तृतीया 2024; दगडूशेठ बाप्पाला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य, पहा कशी मांडली आरास - Akshaya Tritiya 2024 - AKSHAYA TRITIYA 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : May 10, 2024, 1:51 PM IST
पुणे Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट, अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली. पुण्यातील सुप्रसिद्ध आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेंचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीनं हा नैवेद्य देण्यात आला. बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या या आंब्याचा प्रसाद शहरातील विविध नागरिकांना देण्यात येणार आहे.