अनिल देशमुखांचा गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा; म्हणाले"निवडणुकीच्या काळात..." - Devendra Fadnavis - DEVENDRA FADNAVIS
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-05-2024/640-480-21432676-thumbnail-16x9-devendra-fadnavis-anil-deshmukh.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : May 10, 2024, 1:17 PM IST
जळगाव Devendra Fadnavis on Anil Deshmukh : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी (9 मे) माध्यमांशी संवाद साधत असताना मोठा गौप्यस्फोट केला. "माझ्यावर ईडीची कारवाई सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता. तसंच एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही असं मला सांगण्यात आलं होतं. मात्र, मी तसं केलं नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आरोप करणारं ते शपथपत्र होतं", असं देशमुख म्हणाले. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "निवडणूक काळात सनसनी पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल देशमुख हे केवळ कपोलकल्पित बोलतात. तसंच योग्य वेळी मी देखील सत्य बाहेर काढेल," असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.