भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा खुलासा - Devendra Fadnavis Statement - DEVENDRA FADNAVIS STATEMENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 3, 2024, 7:27 AM IST
|Updated : Aug 3, 2024, 8:51 AM IST
नागपूर Devendra Fadnavis Statement : मागील काही दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. मी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केली आहे, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर नागपुरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर इथं आयोजित करण्यात आली. यामध्ये 1 हजार 36 कोटी 38 लाख रुपयांच्या विकासकामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपूर जिल्ह्यात सर्व मतदारसंघात चांगलं काम झालं पाहिजे, यासाठी निधीच्या सुयोग्य वापरासाठी समन्वय, सुसूत्रता आणि काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झालं पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याशिवाय ईतर विकास कामांसाठी 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्यात येतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जीआर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही. पाच वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल, त्यावेळेस पुन्हा असा निर्णय घेऊ, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.