मराठा समाजाकडून धाराशिवमध्ये चक्काजाम आंदोलन, बेमुदत बंद - धाराशिवमध्ये चक्काजाम आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 15, 2024, 6:39 PM IST
धाराशिव (उस्मानाबाद) Chakkajam Protest In Dharashiv : मराठा समाज आज पुन्हा आक्रमक झाला. आजपासून (15 फेब्रुवारी) धाराशिव शहरात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. तसंच चक्काजामही करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा चक्काजाम करण्यात आल्यामुळे धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता पाहता राज्य परिवहन विभागाच्या बसेस बंद करण्यात आल्या. आज सकाळी अचानक मराठा समाजाच्या वतीनं बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांनी वेळीच उपोषण मागे घेतलं नाही आणि जरांगे यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर हिंसक स्वरूपाचं आंदोलन करू अशा तीव्र प्रतिक्रिया मराठा तरुण देऊ लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं म्हणून जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत.