बुलडाणा : एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 1 ठार तर 15 प्रवासी जखमी - बुलडाणा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 9, 2024, 6:55 PM IST
बुलडाणा Buldana Accident : चिखली ते मेरा खु दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज (9 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅव्हल ला ओव्हरटेक करण्याच्या नादात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची शयनयान बस ट्रॅव्हल समोर असलेल्या ट्रकला मागून धडकली. या अपघातात एसटी बस चालकाचे दोन्ही पाय मोडले असून एका 25 वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी आहेत. एम एच 14, एल बी 0544 क्रमांकाची महाराष्ट्र परिवहन महामंडळाची दोन महिन्यांपूर्वी नव्याने सुरू झालेली पुणे ते शेगाव ही शयनयान बस पुण्यावरून शेगावला येत होती. रामनगर फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना ही बस मालवाहू ट्रकला मागून धडकली. या भीषण अपघातात बसते मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील घटनास्थळी पोहचले. ट्रक चालक सध्या फरार आहे. तसंच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.