Union Budget 2024 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतायेत अंतरिम अर्थसंकल्प - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 1, 2024, 11:23 AM IST
|Updated : Feb 1, 2024, 12:00 PM IST
नवी दिल्ली Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळचा अर्थसंकल्प मागील पाच वर्षात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पापेक्षा वेगळा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
अर्थसंकल्पातील घोषणा : तरुणांना बळ देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. तसंच 25 कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं असल्याचंही निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' या पंतप्रधान मोदींची घोषणेनुसार काम सुरू आहे. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तिहेरी तलाक प्रथा बंद केली आहे. यासोबतच महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरं महिलांना देण्यात येणार आहेत, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.