बृहन्मुंबई महापालिकेकडून रुग्णालयासह वसतिगृहांमध्ये डबेवाल्यांना बंदी, डबेवाला असोसिएशनने 'ही' भीती केली व्यक्त - Dabbawala banned in hostels - DABBAWALA BANNED IN HOSTELS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 6:00 PM IST

मुंबई : कोलकात्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता बृहन्मुंबई  महापालिका प्रशासनानं याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनानंं रुग्णालये तसंच वसतिगृहांमध्ये अन्न वितरण करणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं डबेवाल्यांना आता थेट वसतीगृहात जाता येणार नाही. त्यांना संबंधिताचे जेवणाचे डबे गेटवरच ठेवावे लागणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाबाबत मुंबई डबेवाल्यांनी आपली भूमिका मांडली आहे. "सुरक्षेच्या कारणास्तव महापालिका प्रशासनानं निर्णय घेतला असला, तरी डबेवाले तसंच मुंबईकरांचं वेगळं नातं आहे. आम्ही 130 वर्षांपासून डबे वितरण करत आहोत. आम्ही सुरुवातीला डबे थेट डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये, केबिनमध्ये पोहचवित होतो. आता गेटजवळ डबे ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. गेटवर डबे ठेवल्यास तेथून डबे चोरीला जाण्याची शक्यता असते. यामुळं पालिका प्रशासनानं आम्हाला योग्य ती सुरक्षित जागा द्यावी, आमच्याकडून संबंधित सुरक्षेची कागदपत्रे घ्यावीत," अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.