राणे समर्थक आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 16, 2024, 9:48 PM IST
रत्नागिरी Rane Supporters VS Thackeray Group : चिपळूणमध्ये आज (16 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजपा नेते निलेश राणे यांचे समर्थक भिडल्याचं बघायला मिळालं. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाली. भाजपा नेते निलेश राणे यांची आज भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्तानं ते चिपळूणमध्ये आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच सभा गुहागरला असताना निलेश राणे मुंबईतून आले. त्यांनी दापोलीमार्ग फेरी बोटीनं थेट गुहागरला जावं, अशी अपेक्षा होती. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणला आल्याचा भास्कर जाधव यांनी आरोप केला.