रामलल्ला अयोध्येत विराजमान! पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा सोहळ्याचा व्हिडिओ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 1:31 PM IST

Updated : Jan 22, 2024, 2:51 PM IST

अयोध्या Ayodhya Ram Mandir : आज रामनगरी अयोध्येत रामाचे नाव दुमदुमत आहे. आज राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुख्य सोहळा झालाय. गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झालीय. यावेळी मंदिर परिसरात ज्यांना निमंत्रण मिळालंय, त्यांच्यापैकी अनेकांची उपस्थिती होती. यावेळी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली. तसंच यावेळी 18 राज्यांतील वाद्यंही वाजवण्यात आली आहेत. रामलल्लाच्या मुर्तीची पुजा झाल्यानंतर यजमानांच्या हस्ते आरतीही करण्यात आलीय. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जनसभेला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता  अभिषेक बच्चन आदी सेलिब्रिटी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. 

Last Updated : Jan 22, 2024, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.