श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा : साईनगरी शिर्डी सजली; विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन - ram mandir pran pratishtha
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 21, 2024, 9:00 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Shirdi Sai Temple : 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. साईबाबांच्या समाधी मंदिराच्या कळसाला विद्युत रोषणाई करण्यात आलीय. प्रभू श्रीराम यांची प्रतिमा या रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आलीय.
रामरक्षा स्तोत्राचं पठण होणार : मंदिरासह परिसरालाही विद्युत रोषणाई करण्यात आलीय. साईबाबांच्या मंदिरासह परिसर "साईराम" नामानं दुमदुमून गेलाय. 22 जानेवारीला साईबाबांच्या समाधीवर दिवसभर प्रभू श्रीराम यांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता साईबाबांच्या समाधी मंदिरातील मुख्य दर्शन स्टेजवर "रामरक्षा" स्तोत्राचं पठण करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता साईबाबांची आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं सुवर्ण रथातून शिर्डी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिलीय.