जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन; पाहा नयनरम्य व्हिडिओ - Sant Tukaram Maharaj Palkhi - SANT TUKARAM MAHARAJ PALKHI

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 8:45 PM IST

पुणे Sant Tukaram Maharaj Palkhi : टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा... टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊलं... 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी... अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचं आज पुण्यात आगमन झालं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांच्या सुमारास पुण्यात दाखल झाली. मोठ्या उत्साहात तसंच भक्तिमय वातावरणात पुणेकर नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं. आज आणि उद्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्यात मुक्काम असणार आहे. मोठ्या प्रमाणावर पुणेकर नागरिक, गणेश मंडळं, तसंच सामाजिक संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा तसंच विशेष व्यवस्था करण्यात येत असते. यंदाही मोठ्या संख्येनं वारकरी पालखीत सहभागी झाले असून यंदाचा 339 वा पालखी सोहळा आहे. वारकऱ्यांचं पुण्यात आगमन होत असताना संदीप लोखंडे आणि आनंद गाडेकर यांनी 'ईटीव्ही भारत'साठी काढलेले ड्रोन व्हिडिओ. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.