आमचा दुपट्टा, विचारधारा कुणी स्वीकारत असेल तर त्याचं स्वागतचं - चंद्रशेखर बावनकुळे - चंद्रशेखर बावनकुळे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 12, 2024, 6:43 PM IST
नागपूर Chandrasekhar Bawankule : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते अशी ओळख असलेले अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. ती आज खरी होताना दिसत आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आतापर्यंत एकसंध राहिलेल्या काँग्रेसलाही सुरुंग लागला आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक आमदार जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''मी तर हे पूर्वीचं सांगितलं आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा कोणत्या कारणानं दिला आधी बघावं लागेल. मोठ्या प्रमाणावर नेते भाजपामध्ये येणार आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. ऐका ते काय म्हणाले.