अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 22, 2024, 11:16 AM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडी (MVA) कोणाचं सरकार सत्तेत येणार? याकडं संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. याचं उत्तर उद्या स्पष्ट होईल. परंतु, असं असलं तरी निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात पर्वती विधानसभा मतदारसंघाचे (Parvati Assembly Constituency) अध्यक्ष संतोष नांगरे यांनी प्रभागात अजित पवार यांचे "मुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन", या आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत अनेकवेळा जाहीर भाषणांमध्ये खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.