ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावर आज होणार सुनावणी - Judicial Custody To Kundlik Khande - JUDICIAL CUSTODY TO KUNDLIK KHANDE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 6, 2024, 10:23 AM IST
बीड Judicial Custody To Kundlik Khande : शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेला अटक करण्यात आली. 6 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर खांडेला शुक्रवारी (5 जुलै) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास कामी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, कुंडलिक खांडे यांच्या वकिलानं युक्तिवाद करुन पोलिसांचा तपास पूर्णपणे होत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं. यालाच अनुसरुन न्यायालयानं कुंडलिक खांडेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज (6 जुलै) बीड न्यायालयात कुंडलिक खांडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.