हैदराबाद YouTube shorts video : तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल आणि तुम्हाला लांब शॉर्ट्स बनवायचे असतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे. YouTube ने Shorts व्हिडिओसाठी मोठी घोषणा केली आहे. YouTube नं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की आता वापरकर्त्यांना 3 मिनिटांपर्यंत म्हणजेच 180 सेकंदांपर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ तयार आणि अपलोड करण्याची सुविधा मिळेल. यूट्यूबनं आपल्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. वापरकर्त्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं यूट्यूबनं म्हटलं आहे. आता शॉर्ट्स व्हिडिओचा कालावधी 60 के 180 सेकंद असेल.
3 मिनिटांपर्यंत व्हिडिओ बनवता येणार : YouTube Shorts व्हिडिओ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी YouTube नं अपडेटची घोषणा केली आहे. YouTube उभ्या व्हिडिओ तयार करण्याची क्षमता वाढवत आहे. 2020 YouTube Shorts व्हिडिओचा पर्याय दिला होता. मात्र तिथं फक्त 60 सेकंदांपर्यंतच व्हिडिओ रेकॉर्ड करता येत होता. आता कंपनी 15 ऑक्टोबरपासून 3 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास अनुमती देणार आहे.
YouTube Shorts चे अपडेट : याशिवाय YouTube नं जर कंटेंट क्रिएटरसाठी नवीन टूल्सची घोषणा केली आहे. पहिलं 'रिमिक्स' नावाचं टूल्स आहे. हे टूल वापरकर्त्यांना टेम्प्लेट म्हणून लोकप्रिय शॉर्ट्स वापरून त्यांचे स्वतःचे व्हिडिओ तयार करण्यास मदत करणार आहे. YouTube नं असंही म्हटलं आहे, की "शॉर्ट्स व्हिडिओला येत्या काही महिन्यांत अपडेट मिळणार आहे.प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळ्या व्हिडिओंमधून क्लिप रीमिक्स करणं आणखी सोपे होईल."
Veo लवकरच YouTube वर : YouTube लवकरच Google चं Veo इमेज जनरेशन मॉडेल YouTube Shorts वर आणणार आहे. Veo हे Google चे इमेज जनरेशन मॉडेल आहे, जे 1080p पर्यंत रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ तयार करू शकतं. तसंच या टूल्समुळं वेगवेगळ्या सिनेमॅटिक शैलींमध्ये व्हिडिओ तयार करता येतात. यूट्यूबच्या या निर्णयामुळं मेटाचा ताण वाढू शकतो, कारण मेटानं इंस्टाग्राम रीलचा कालावधी 90 सेकंद निश्चित केला आहे. यूट्यूबनं व्हिडिओचा कालावधी थेट दुप्पट केल्यास आगामी काळात इंस्टाग्राम रीलमध्येही असे बदल पाहायला मिळू शकतात.
हे वाचलंत का :