हैदराबाद PHONE OVERHEATING : दिवसभर स्मार्टफोन वापरणं ही आता केवळ सवयच नाही, तर गरजही बनली आहे. अशा परिस्थितीत, स्मार्टफोन बऱ्याचदा गरम होऊ लागतो. त्यामुळं काय करावं, हे समजत नाही. फोनचे वाढलेलं तापमान कमी करता यावं, यासाठी तुम्ही तात्काळ काही सेटिंग्ज बदलणं गरजेचं असतं. अन्यथा तुमच्या फोनच मोठ नुकसान होण्याची शक्यता असते. फोन दीर्घकाळ सुरू असल्यास त्याच्या बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. तसंच फोन सतत गरम होत असल्याचं तुमच्यासोबत घात देखील होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही तुमच्या फोनची काळजी कशी घ्यावी, कोणती सेटिंग्ज करावी याबाबत काही ट्रीक्स आहेत. त्या फॉलो करून तुम्ही तुमचा फोन गरम होण्यापासून वाचवू शकता.
ब्लूटूथ बंद करा : स्मार्टवॉच तसंच ब्लूटूथ इयरबड बहुतेक उपकरणांशी जोडलेले राहतात. सतत ब्लूटूथ कनेक्शन असण्यावर परिणाम होतोच, त्याशिवाय तुमचा फोन नवीन उपकरणांसाठी स्कॅन करत राहतो. ही प्रक्रिया थांबवल्यानं फोनला विश्रांती मिळू शकते. त्यामुळं तुमचा स्मार्टफोन गरम झाल्यास तुम्ही काही काळ ब्लूटूथ किंवा इतर कनेक्टिव्हिटी पर्याय बंद करू शकता.
ब्राइटनेस कमी ठेवा : उन्हाळ्यात फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस जास्त असते, तेव्हा फोन गरम होऊ लागतो. फोन थंड ठेवण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता. याशिवाय, जर तुम्ही घराच्या आत असाल तर कमी ब्राइटनेसमध्ये स्क्रीन पाहणं फायद्याचं ठरू शकतं.
फ्लाईट मोड चालू करा : तुमचा फोन अचानक खूप गरम वाटत असल्यास, तुम्ही ताबडतोब विमान (फ्लाईट) मोड चालू करा. वास्तविक, अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. तेव्हा तुमचा मोबाइल डेटा देखील वाया जाते हे तुमच्याही लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत, काही काळासाठी तुमचा फोन फ्लाईट मोडवर टाकल्यास तुमचा डाटाही वाचेल तसंच फोनही गरम होणार नाही. यानंतर फोनचं तापमान काही वेळात सामान्य होईल.
चार्जिंग करताना सावधगिरी बाळगा : अनेकांना फोन जास्त वेळ चार्जिंगवर ठेवण्याची सवय असते. असे केल्यास फोन गरम झाला, तर लगेच फोनचं चार्जिंग थांबवा. याशिवाय तुम्ही फक्त तुमच्या फोनला कोणतही चार्जर वापरू नये. चार्जिंगबाबत निष्काळजीपणा करणं योग्य नाही. तसंच, फोन चार्ज होत असताना वापरणं बंद करावं.
विशेष मोड सुरू करा : अनेक स्मार्टफोनमध्ये, वापरकर्त्यांना विशेष मोड किंवा बॅटरी बचत मोड दिलेले असतात. त्यामुळं तुम्ही अशा मोडचा वापर करावा. याशिवाय, जर लो-परफॉर्मन्स किंवा बॅटरी सेव्हिंग मोड उपलब्ध असेल, तर ते चालू करून तुम्ही फोनवर जास्त लोड होणार नाही याची खात्री करू शकता.
'हे' वाचलंत का :