हैदराबाद Vivo T3 Ultra Launched Today : Vivo T3 Ultra 5G फोन आज 12 सप्टेंबरला लॉन्च झाला. कंपनीचा नवीन फोन Vivo T3 Ultra 5G लाँच करण्यासाठी Vivo नं जय्यत तयारी केली होती. लॉन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर या फोनबाबत एक मायक्रोसाइट सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ फोन लॉन्च होण्याच्या एक दिवस अगोदरच बरीच अधिकृत माहिती समोर आली आहे. या फोनच्या कॅमेरा आणि डिस्प्लेबाबत सर्व माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया या फोनचे टॉप 5 फीचर्स काय असतील.
Hold on tight! The turbo-charged #vivoT3Ultra5G is speeding your way on 19th September! Mark your calendars and gear up to #GetSetTurbo – it's going to be an electrifying ride! pic.twitter.com/Ed07ZqnHvM
— vivo India (@Vivo_India) September 12, 2024
Vivo T3 Ultra चे 5 फिचर : Vivo T3 Ultra लाँच होण्याआधीच, हा फोन कोणत्या टॉप 5 फीचर्ससह सादर केला जाणार आहे, ते पाहूया.
Vivo T3 अल्ट्रा स्मार्टफोन कॅमेरा सेटअप : Vivo T3 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX921 कॅमेरा असणार आहे. यात OIS सपोर्ट देखील असेल, याशिवाय तुम्हाला या फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देखील मिळेल. हा कॅमेरा Vivo V40 Pro मध्ये आधीच दिसला आहे. हा फोन एक उत्तम कॅमेरा फोन असणार आहे.
Vivo T3 अल्ट्रा स्मार्टफोन डिस्प्ले : Vivo T3 अल्ट्रा स्मार्टफोनला 6.78-इंच AMOLED स्क्रीन मिळणार आहे. HDR10+ सपोर्ट व्यतिरिक्त, या डिस्प्लेमध्ये 4500 nits च्या ब्राइटनेससह 120Hz रिफ्रेश रेट आणि 10-बिट कलर देखील असेल.
Vivo T3 Ultra मध्ये शक्तिशाली प्रोसेसर : Vivo T3 Ultra च्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं तर, काही वेळापूर्वी आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की तुम्हाला या फोनमध्ये Dimensity 9200 Plus प्रोसेसर मिळणार आहे. याशिवाय, फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आणि 12GB रॅमसह 256GB स्टोरेज असेल. तुम्हाला फोनमध्ये 12GB पर्यंत व्हर्चुअल रॅमचा पर्यायही मिळतो.
Vivo T3 Ultra मध्ये शक्तिशाली बॅटरी : Vivo T3 Ultra बद्दल असं सांगितलम जात आहे, की या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 5500mAh ची बॅटरी मिळणार आहे. याशिवाय फोन स्लिम 7.58mm असणार आहे. तुम्हाला या फोनमध्ये IP68 प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. ज्यामुळं फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनणार आहे.
Vivo T3 Ultra ची किंमत किती ? स्पेक्स आणि फीचर्सबाबत माहिती समोर आली असली, तरी या फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा फोन जवळपास 29,999 रुपयांच्या किंमतीत सादर केलाय.
हे वाचलंत का :
- तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch
- मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars
- Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched