बेंगळुरू PSLV 37 : PSLV 37 रॉकेटचा वरचा भाग म्हणजेच PS4 पृथ्वीच्या वातावरणात परत आला आहे. 2017 मध्ये या रॉकेटद्वारे विक्रमी 104 उपग्रह सोडण्यात आले होते. सप्टेंबर 2024 पासून घटत्या परिभ्रमण उंचीचं नियमितपणं निरीक्षण करण्यात आलं. त्यावेळी PS4 रॉकेट 6 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या वातावरणात परतलंय. 2030 पर्यंत कचरामुक्त अवकाश मोहिमेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इस्रो आपले प्रयत्न चालू ठेवेल.
104 उपग्रहाचं प्रेकक्षेपण : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं मंगळवारी सांगितलं, की PSLV-37 रॉकेटचा वरचा भाग म्हणजेच PS4 पृथ्वीच्या वातावरणात परत आला आहे. 2017 मध्ये या रॉकेटद्वारे विक्रमी 104 उपग्रह सोडण्यात आकाशात सोडण्यात आले होते. PSLV-C37 हे कार्टोसॅट-2डी आणि इतर 103 उपग्रहांसह 15 फेब्रुवारी 2017 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं. उपग्रहांना त्यांच्या कक्षेत पाठवल्यानंतर, रॉकेटचा वरचा भाग (PS4) अंदाजे 4 कोटी 70 लाख 3 हजार 494 किमी आकाराच्या कक्षेत फिरत राहिला. त्याचं नियमित निरीक्षण केलं गेलं. त्यानंतर त्याची उंची हळूहळू कमी होत गेली.
PSLV-C37's upper stage, from the historic launch of 104 satellites, re-entered Earth's atmosphere 🌍 on 6th Oct 2024 within 8 years of launch! Impact in the Atlantic Ocean 🌊. ISRO leads space debris management 🌠 #SpaceDebris and the way to cleaner space! 🚀
— ISRO (@isro) October 8, 2024
For more information… pic.twitter.com/rISMkHVmEH
PS4 पृथ्वीच्या कक्षेत परतलं : सप्टेंबर 2024 पासून घटत्या परिभ्रमण उंचीचं नियमितपणे निरीक्षण करण्यात आले. PS4 6 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या कक्षेत परतलंय. प्रक्षेपणानंतर आठ वर्षांच्या आत रॉकेटच्या भागांचा वातावरणात पुन्हा प्रवेश करणं, हे इंटर-एजन्सी स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन कमिटीच्या (IADC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. सूचनांनुसार, निष्क्रिय वस्तू मोहिमेनंतर 25 वर्षे पृथ्वीच्या कक्षेत (LEO) राहिली पाहिजे. 2030 पर्यंत करचामुक्त अवकाश मोहिमेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इस्रो आपलं प्रयत्न चालू ठेवेल.
हे वाचलंत का :