ETV Bharat / technology

इस्रो विद्यार्थ्यांना देणार अंतराळ संशोधन प्रशिक्षण; जाणून घ्या काय आहे इस्रोचा 'स्टार्ट' कार्यक्रम - Start 2024 ISRO

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 2:13 PM IST

Start 2024 ISRO
संग्रहित छायाचित्र

Start 2024 ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) विद्यार्थ्यांना अंतराळात संशोधन करण्यासाठी संधी देत आहे. इस्रोनं विद्यार्थ्यांसाठी स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग (START) हा कार्यक्रम जाहीर केला आहे. स्टार्ट कार्यक्रमाचं उद्दिष्टे काय आहेत, याबाबतची ही सविस्तर माहिती.

हैदराबाद Start 2024 ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ( ISRO ) मंगळवारी अंतराळ कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात इस्रोनं स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग (START) 2024 ची घोषणा केली. या कार्यक्रमानुसार, आता विद्यार्थ्यांनाही अंतराळ संशोधनाचं प्रशिक्षण घेता येणार आहे.

इस्रोनं सुरू केलेलं START म्हणजे नेमकं काय आहे ? : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार पदवीला असलेले आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानचं ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान जागरुकता प्रशिक्षण (START) 2024 कार्यक्रम एप्रिल-मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सुरू केलेल्या या कार्यक्रमात ग्रह, विज्ञान, सूर्य, पृथ्वी, खगोलशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र मायक्रोग्रॅविटी आदी विषयाचा समावेश आहे.

काय आहे 'स्टार्ट' कार्यक्रमाचं उद्दिष्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सुरू केलेला स्टार्ट हा कार्यक्रम सुरू केल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा अंतराळ अभ्यास करणयासाठी फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडं आकर्षित करणं, हा या प्रशिक्षणामागचा हेतू आहे. या प्रशिक्षणात अंतराळ विज्ञान आणि प्राथमिक स्तरावरील माहितींचा समावेश असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन आणि संशोधन संधी यावर या प्रशिक्षण कार्यक्रमात सत्रं असणार आहेत.

काय आहेत स्टार्ट प्रशिक्षणासाठी पात्रतेचे निकष : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सुरू केलेला स्टार्ट हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनात संधी निर्माण करणारा आहे. त्यासाठी पदव्युत्तर विद्यार्थी हा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाचा असावा. किंवा तंत्रज्ञान विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यानं इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, अप्लाइड फिजिक्स, रेडिओफिजिक्स, ऑप्टिक्स आणि ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आदी संबंधित विषयाला प्रवेश घेतलेला असावा. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या अंतिम वर्षाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांचाही अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रशिक्षणासाठी विचार केला जाईल, असंही इस्रोनं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. महापालिकेचे बाल शास्त्रज्ञ निघाले इस्रोला; खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याची मिळाली सुवर्णसंधी
  2. इस्रोनं रचला इतिहास ! अंतराळात पाठविला 'नॉटी बॉय'; वाचा सविस्तर काय आहे मिशन?
  3. "मिशन पूर्ण करुनच अंतिम श्वास सोडेन": इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ 'असं' का म्हणाले?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.