हैदराबाद : कार उत्पादक कंपनी स्कोडा भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक बॅटरीसह पॉवरट्रेन आणि ICE, CNG मॉडेल आणण्याची योजना आखत आहे. Skoda युरोपियन बाजारपेठेत G-TEC CNG प्रणालीसह Scala आणि Citigo कॉम्पॅक्ट हॅचबॅक सारखी मॉडेल्स ऑफर करतेय. मात्र, पुरेशी मागणी ग्राहकांनी केल्यानंतरच कंपनी सीएनजी कार लॉंच करणार आहे.
सीएनजी पॉवरट्रेन : सध्या, स्कोडा कंपनी भारतीय मॉडेल्समध्ये 1.0-लिटर TSI इंजिन ऑफर करतेय. हे इंजिन भारतात तयार झालेलं आहे. तसंच विशिष्ट मॉडेलला 1.5-लीटर TSI इंजिन मिळतंय, ज्यात 1.0-लिटर इंजिनपेक्षा अधिक आयात केलेले घटक आहेत. अशा परिस्थितीत, खर्च कमी करण्यासाठी कंपनी स्थानिक पातळीवर तयार केलेले 1.0-लिटर TSI इंजिन CNG पर्यायासह सादर करू शकते. युरोपियन सीएनजी कारमध्ये हे इंजिन असल्यामुळं याची शक्यता जास्त आहे.
भविष्यात पुरेशी मागणी दिसली तरच CNG इंजनवर काम करण्यात येईल. तसंच आम्ही मारुती फ्रंटएक्स, मारुती ब्रेझा, मारुती बलेनो, टोयोटा टायसर आणि टोयोटा ग्लान्झा सारख्या कारच नाही तर टाटा पंचच्या टॉप-स्पेक कारला टक्कर देईल.
कैलाक पहिली सीएनजी कार : स्कोडाची कैलाक ही पहिली सीएनजी कार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात नुकत्याच लाँच झालेल्या नवीन Skoda Kylak ची CNG आवृत्ती येण्याची दाट शक्यता आहे. हे टाटा पंच आणि ह्युंदाई एक्सेटर सीएनजी आवृत्त्यांशी स्पर्धा करेल. Kylak 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात आलीय आहे. जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क निर्माण करतं. सीएनजी मोडमध्ये आउटपुट वेगळे असणे अपेक्षित आहे. पेट्रोल आवृत्तीची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर CNG कारची किंमत 50,000-80,000 रुपये अधिक अशू शकते.
'हे' वाचलंत का :