ETV Bharat / technology

सॅमसंगची जगातील पहिली नेक्स्ट एआय कंप्युटिंगसाठी 24Gb GDDR7 DRAM चिप सादर

सॅमसंगनं जगातील पहिली 24Gb GDDR7 DRAM चिपची घोषणा केलीय. हि चिप पुढील पिढीतील AI संगणन, उच्च कार्यक्षमता ऍप्लिकेशन्ससाठी महत्वाची ठरणार आहे.

Samsung
सॅमसंग (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 19, 2024, 7:10 PM IST

हैदराबाद : सॅमसंगनं जगातील पहिल्या 24Gb GDDR7 DRAM चीपची घोषणा केली आहे. AI संगणन आणि उच्च-कार्यक्षमता ऍप्लिकेशन्सला यामुळं गती मिळणार आहे. याबाबत सॅमसंगनं म्हटलं की, GPU ग्राहकांकडून नेक्स्ट जनरल AI संगणन प्रणालीमध्ये 24Gb GDDR7 चं प्रमाणीकरण या वर्षी सुरू होईल. कंपनीनं पुढील वर्षाच्या सुरुवातीला या ही चिप आण्याची घोषणा केलीय. त्यामुळं ही चिप तुम्हा पुढील वर्षी PC आणि कदाचित लॅपटॉपमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

उच्च कार्यक्षमता मेमरी सोल्यूशन्स : 24Gb GDDR7 चिप चा वापर उच्च कार्यक्षमता मेमरी सोल्यूशन्ससाठी करण्यात येईल. यात डेटा सेंटर आणि AI वर्कस्टेशनचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, हे ग्राफिक्स कार्ड, गेमिंग कन्सोल आणि स्वायत्त ड्रायव्हिंगमधील ग्राफिक्स DRAM मध्ये देखील वापरलं जाईल.

मागील आवृत्तीच्या तुलनेत चांगली : सॅमसंगनं गेल्या वर्षी पहिली चिप 16Gb GDDR7 विकसित केली. नवीन 24Gb GDDR7 चा पूर्वप्रमाणेच आकार आहे. ही चिप 5th-gen 10nm-वर्ग DRAM चा वापर करते. 24Gb GDDR7 40 Gbps चिप (gigabits-प्रति-सेकंद) ग्राफिक्स DRAM साठी गती प्राप्त करण्यासाठी 3-स्तरीय पल्स-एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (PAM3) सिग्नलिंगचा वापर करते. मागील आवृत्तीच्या तुलनेत हि 25 टक्के सुधारित आहे. GDDR7 चं कार्यप्रदर्शन 42.5Gbps पर्यंत वाढवलं ​​जाऊ शकतं, असा कंपनीचा दावा आहे.

ग्राफिक्स DRAM मध्ये वापर : मोबाईल उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रथमच ग्राफिक्स DRAM मध्ये वापर करून उर्जा कार्यक्षमता वाढविण्याचा दावा देखील करतं. सॅमसंगनं क्लॉक कंट्रोल मॅनेजमेंट आणि ड्युअल व्हीडीडी डिझाइन यासारख्या पद्धती लागू करून पॉवर कार्यक्षमतेत 30 टक्क्यांहून अधिक सुधारणा साध्य करण्यासाठी अनावश्यक वीज वापर कमी केल्याचा दावा केला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कसं करणार ऑनलाईन तिकीट बुक?
  2. इलेक्ट्रॉन गतिशीलता मर्यादित करणारी यंत्रणा संशोधकांनी काढली शोधून
  3. ब्लॅक थीमसह Mahindra Scorpio Classic Boss Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.