ETV Bharat / technology

जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन जाहीर, 200 दिवसांची वैधता, 2025 रुपयांमध्ये अमर्यादित 5G डेटाचा लाभ

Jio नं 2,025 रुपयांचा नवीन "न्यू इयर वेलकम प्लॅन" सादर केला आहे. प्लॅन अंतर्गत, एकूण 500GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 2150 रुपयाचं कूपन मिळतंय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

हैदराबाद Jio New Year Welcome Plan : नवीन वर्षाची सुरवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं नवीन वर्षाचं जल्लोषात सेलिब्रेशन करण्यासाठी धमाकेदार प्रीपेड प्लॅन आणला आहे. Jio चा हा नवीन "न्यू इयर वेलकम प्लॅन" बाजारात 2,025 रुपयांना लॉंच करण्यात आला आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट 5G कनेक्टिव्हिटी, उत्तम बचत आणि 2,150 रुपयांपर्यंतचा विषेश फायदा मिळेल. आता या नवीनतम परवडणाऱ्या प्लॅनचे फायदे, वैधता आणि विशेष कूपन सवलतींबद्दल तपशीलवार माहिती घेऊ या...

जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन : अमर्यादित 5G कनेक्टिव्हिटी : या नवीन प्लॅन अंतर्गत, Jio वापरकर्त्यांना वेगवान आणि अखंडित 5G इंटरनेट मिळेल, ज्यामुळं ते सहजपणे ब्राउझ, स्ट्रीम, गेम आणि व्हिडिओ कॉल करू शकतात.

500 GB 4G डेटा (2.5 GB/दिवस) : या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 200 दिवसांसाठी एकूण 500 GB डेटा मिळेल. याचा अर्थ असा की तुम्ही दररोज 2.5 GB डेटा वापरू शकता, ज्यामुळं तुम्हाला डेटा मर्यादेची चिंता न करता इंटरनेटचा पुरेपूर आनंद घेता येईल.

अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एसएमएस : या प्लॅनसह, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित कॉल आणि एसएमएसचा लाभ मिळेल.

भागीदार कूपनसह 2150 ची बचत : Jio च्या भागीदार ब्रँड्सकडून सवलती आणि डीलसह या योजनेचा अधिक लाभ घेता येईल.

विशेष कूपन सवलत :

  • 500 रुपये AJIO कूपन : AJIO वर 2,500 रुपयांच्या किमान खरेदीवर 500 रुपयांचं कूपन मिळेल.
  • Swiggy वर Rs 150 ची सूट : Swiggy वर Rs 499 पेक्षा जास्त ऑर्डरवर Rs 150 ची सूट मिळवा.
  • फ्लाइट बुकिंगवर 1500 वाचवा : EaseMyTrip वर फ्लाइट बुकिंगवर रु. 1500 ची सूट मिळवा, ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी स्वस्त होईल.

बचत आणि ऑफर कालावधी : हा प्लॅन खरेदी करून, ग्राहक 468 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कारण त्याच वैधतेसह (6 महिने) आणि फायद्यांसह Jio चा प्लॅन 349 रुपये प्रति महिना किंमतीत येतो. यासोबतच ग्राहकांना या प्लॅनवर 2150 रुपयांपर्यंतच्या कूपन डिस्काउंटचाही लाभ मिळणार आहे. त्यामुळं हा प्लान वापरकर्त्यांसाठी परवडणारा आहे. लक्षात ठेवा, ही ऑफर केवळ 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे.

हे वाचलंत का :

  1. NEET PG समुपदेशन 2024 चं अपडेट वेळापत्रक जारी, 'इंथ' पहा सुधारित वेळापत्रक
  2. CTET प्रवेशपत्र 2024 आज प्रसिद्ध होणार, 'ही' लिंक वरून प्रवेशपत्र करा डाउनलोड
  3. 200 मेगापिक्सेलचा 'Vivo X 200' आणि 'X 200 Pro' आज होणार लॉंच, Vivo X200 5G चे अपेक्षित तपशील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.