हैदराबाद Redmi A4 5G : Xiaomi नं आज भारतीय मोबाइल काँग्रेसमध्ये आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन सादर केला. Redmi A4 5G हा कंपनीचा नवीनतम फोन आहे जो Qualcomm तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या फोनमध्ये शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसरचा वापर केलाय. तसंच, या प्रोसेसरसह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. भारतातील एंट्री-लेव्हल स्मार्टफोनसाठी हा एक महत्त्वाचा फोन आहे. विशेषत: 5G कनेक्टिव्हिटी हे या फोनचं शक्तिशाली वैशिष्ट्य आहे. Redmi A4 5G हा भारतातील पहिला फोन आहे, जो स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 मोबाईलसह सादर झाला आहे.
Introducing the @RedmiIndia A4, featuring the Snapdragon 4s Gen 2! Experience affordable #5G, all-day battery, and an upgraded camera—because everyone deserves cutting-edge technology. 🔥 #5GForAll #IMC2024 #QualcommAtIMC2024 #ViksitBharat pic.twitter.com/1KiANQ8iWE
— Snapdragon India (@Snapdragon_IN) October 16, 2024
Qualcomm Technologies चा वापर : यावेली Xiaomi कंपनीनं सांगितलं की भारतात एंट्री-लेव्हल स्मार्टफोनसह होत असलेल्या 5G मध्ये आणखी सुधारणा करण्याचा त्यांचा मानस आहे. पुढील दशकात 700 दशलक्ष स्मार्टफोन विकण्याचा कंपनीचा विचार आहे. Xiaomi आणि Qualcomm Technologies नं भारतातील लाखो ग्राहकांना Gigabit जलद कनेक्टिव्हिटी प्रत्यक्षात आणण्यासाठी हातमिळवणी केली आहे. क्वालकॉम इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अध्यक्ष सॅवी सोईन म्हणाले, “5G चा प्रवेश विकसित भारतासाठी महत्त्वाचा घटक असेल. Snapdragon 4S Gen 2 ची रचना ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा लाभ घेण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं करण्यात आली. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत परवडणारी 5G उपकरणे आणण्यासाठी Xiaomi उत्साहित आहे.
We are excited to announce our latest collaboration with @qualcomm_in at the Indian Mobile Congress 2024
— Muralikrishnan B (@hawkeye) October 16, 2024
Introducing the global debut of #RedmiA45G, powered by #Snapdragon 4s Gen 2, making #5GForEveryone a reality!#IMC2024 @SaviSoin pic.twitter.com/g3fIceGcSV
Redmi A4 5G प्रोसेसर : Snapdragon 4s Gen 2 चिप Snapdragon 4 Gen 2 प्रमाणेच 4nm प्रोसेसिंग नोडचा वापर करतं. हे 90fps FHD+ डिस्प्लेला समर्थन देतं. यात ड्युअल 12-बिट ISP कॅमेरा सपोर्ट आहे, जो गीगाबिट 5G कनेक्टिव्हिटीसाठी एक शक्तिशाली मोडेम आहे. NAVIC सह ड्युअल-फ्रिक्वेंसी GNSS (L1 + L5) ला फोन सपोर्ट करतोय.
Redmi A4 5G ची भारतात किंमत ? : कंपनीनं सांगितलं की, Redmi A4 5G लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. त्याच्या किंमतीबद्दल, असं सांगण्यात आलं 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल. तथापि, Xiaomi नं अद्याप त्याची अचूक किंमत निश्चित केलेली नाही.
हे वाचलंत का :