ETV Bharat / technology

Realme Neo7 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर आहेत, पुढील आठवड्यात होणार लॉंच - REALME NEO7 SMARTPHONE

Realme पुढील आठवड्यात आपला नवीन Realme Neo7 स्मार्टफोन लॉंच करणार आहे. लॉंचपूर्वी या फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Realme Neo7
Realme Neo7 (Realme)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 8:40 AM IST

हैदराबाद Realme Neo7 : Realme चा नवीन स्मार्टफोन Neo7 लवकरच लॉंच होणार आहे. अलीकडेच त्याची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये आणि डिझाइन समोल आलं आहे. फोनचा फ्लॅट स्क्रीन असून प्लास्टिक फ्रेम असणार आहे. उघड झालेल्या तपशीलांवर एक नजर टाकूया या बातमीतून...

Realme Neo7 वैशिष्ट्ये : Neo7 मध्ये मोठी 7000mAh बॅटरी असेल. या फोनचं वजन 213.4 ग्रॅम असणार आहे. फोनची जाडी केवळ 8.56 मिमी आहे, ज्यामुळं ते खूपच डॅशिंग दिसतोय. हा फोन 8.5 तास सतत गेमिंगचा अनुभव देईल आणि कमाल तापमान 40.2 डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल, असा कंपनीचा दावा आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हे उत्कृष्ट ग्राफिक्ससाठी Dimensity 9300+ प्रोसेसर आणि Immortalis-G720 GPU नं सुसज्ज आहे. तसंच, यात Realme GT Performance Engine आणि 7700mm² सिंगल VC हीट डिसिपेशन एरिया आहे, जे गेमिंगचा अनुभव सुधारेल.

50MP प्राथमिक कॅमेरा : कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झाल्यास, यात 50MP प्राथमिक कॅमेरा (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. स्टोरेजसाठी, हे 12GB/16GB LPDDR5X रॅम आणि 256GB/512GB UFS 4.0 स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. इतर वैशिष्ट्यांमध्ये, स्मार्टफोन IP68 आणि IP69 रेटिंगसह पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. यात स्टिरीओ स्पीकर, हाय-रिस ऑडिओ आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, हे 5G, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4 आणि USB टाइप-सी पोर्टला समर्थन देतो.

Realme Neo7 किंमत : Realme Neo7 ची सुरुवातीची किंमत 2499 युआन (सुमारे 29,060 रुपये) असण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात लॉंच झाल्यानंतरच त्याची नेमकी किंमत आणि फीचर्सची माहिती उपलब्ध होईल. मात्र हा फोन सध्या चीनमध्ये लॉंच होणार आहे. त्यानंतर तो जागतिक बाजारपेठेत लॉंच करण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. संगीत प्रेमींना झिंगाट होण्याची संधी, Xiaomi चा साउंड आउटडोअर वॉटरप्रूफ स्पीकर करतोय एंट्री
  2. OnePlus 12 वर 10 हजारांची सूट, OnePlus 13 लाँच होण्यापूर्वीच किंमत केली कमी
  3. iQOO 13 भारतात लॉंच, अल्ट्रा आयकेअर डिस्प्ले असलेला जगातील पहिला फोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.