ETV Bharat / technology

फक्त एका हजारात करा Realme GT 7 Pro प्री-बुक, पाण्यात देखील काढता येणार फोटो

Realme GT 7 Pro स्मार्टफोनची प्री-बुकिंग 18 नोव्हेंबरला रोजी दुपारी सुरू होईल. तुम्ही हा फोन 1 हजारांमध्ये बुक करू शकता. यासोबतच तुम्हाला बँक ऑफर्स मिळतील.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

हैदराबाद : Realme GT 7 Pro स्मार्टफोनची प्री-बुकिंग 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही दुपारी एक वाजता रियलमी.कॉमवर प्री-बुक करू शकता. तसंच Amazon सह इतर ऑनलाइन वेबसाईटवर तुम्ही फोनची ऑर्डर देऊ शकता. या फोनचे फीचर, बँक ऑफर्स, EMI पर्यायाबद्दल जाणून घेऊया बातमीतून...

Realme GT 7 Pro प्री-बुकिंग : Realme 18 नोव्हेंबर 2024 पासून आपल्या नवीन स्मार्टफोन Realme GT 7 Pro ची प्री-बुकिंग सुरू करणार आहे. ग्राहक Amazon.in, Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून फोन प्री-बुकिंग करू शकतात. Realme GT 7 Pro लाँच झाल्यानंतर लगेच 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून realme.com वर खरेदी करता येईल.

Realme GT 7 Pro चे फीचर : Realme नं या फोचनी काही प्रमुख फीचर उघड केले आहेत. Realme GT 7 Pro चा कॅमेरा सेटअप खूप खास आहे. यात 50MP Sony IMX882 टेलिफोटो लेन्स असेल जो 3x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करेल. याशिवाय, यात 50MP Sony IMX906 प्राथमिक कॅमेरा आणि 8MP वाइड-एंगल लेन्स देखील असतील.

अंडरवॉटर फोटोग्राफी मोड : विशेष गोष्ट म्हणजे यात अंडरवॉटर फोटोग्राफी मोड देखील आहे, ज्यामुळं वापरकर्त्याला पाण्यात फोटो काढता येईल. IP69 रेट असलेला हा फोन 2 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे ठेवता येईल. Realme च्या या फोनमध्ये 6.78-इंचाचा LTPO Eco OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 6000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस समाविष्ट आहे. याशिवाय 6500mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगची सुविधाही दिली जाईल.

पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित : Realme GT 7 Pro हा स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असणार आहे. या फोनचं सुंदर मार्स डिझाइन त्याला प्रीमियम लुक देतं. तसंच, क्रिस्टल आर्मर ग्लास त्याची ताकद आणखी वाढवतं. हा फोन IP69 रेटिंगसह येतो, जो धूळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित असणार आहे.

Realme GT 7 Pro ची लॉंच तारीख आणि किंमत : Realme GT 7 Pro 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी लॉंच होण्याची शक्यता आहे. लॉंच दरम्यान या फोनची किंमत जाहीर केली जाईल, परंतु Realme च्या मते, हा एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल.

काय आहे Realme GT 7 Pro वर ऑफर : Realme GT 7 Pro फोनची प्री-बुकिंग केल्यावर, तुम्हाला 3 हजारांची बँक सवलत, 12 महिने विनाशुल्क EMI, 1 वर्षाचा स्क्रीन नुकसान विमा आणि 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळेल. ऑफलाइन खरेदी केल्यास हा फोन 2 हजारांमध्ये प्री-बुक केला जाऊ शकतो. ऑफलाइन प्री-बुकिंगवर, तुम्हाला 3 हजारांची बँक सवलत, 12 महिने विनाशुल्क EMI आणि 24 महिन्यांचा मासिक हप्ता पर्याय देखील मिळेल. यासोबतच तुम्हाला 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळेल.

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग Galaxy M05 भारतात 50MP ड्युअल कॅमेरा आणि जबरदस्त डिस्प्लेसह लॉंच
  2. व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
  3. YouTube Shorts निर्मात्यांसाठी AI फीचर, AI च्या माध्यमातून गाणी करता येणार रीमिक्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.