ETV Bharat / technology

पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor - DRIVERLESS ELECTRIC TRACTOR

AI powered Driverless Electric Tractor : पुण्यातील सिद्धार्थ गुप्ता या तरुणानं विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवलाय. या ट्रॅक्टरमुळं आता डिझेलसह चालकाचा खर्चही वाचणार आहे. त्यामुळं या ट्रॅक्टरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Pune News 25 years old Siddharth Gupta has built an AI powered Driverless Electric Tractor
विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 9:50 PM IST

पुणे AI powered Driverless Electric Tractor : भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. भारतात पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेती देखील केली जाते. शेती करत असताना शेतकरी सर्वाधिक ट्रॅक्टरचा वापर करतात. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात राहणाऱ्या 25 वर्षीय सिद्धार्थ गुप्ता या तरुणानं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केलाय. विशेष बाब म्हणजे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये एआय सिस्टम लावल्यामुळं हा ट्रॅक्टर विना चालक शेतातील सर्व कामं करणार आहे. तसंच या ट्रॅक्टरची सोलारवर चार्जिंग करता येईल. त्यामुळं या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

सिद्धार्थ गुप्ता या तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (ETV Bharat Reporter)

25 वर्षीय सिद्धार्थनं बनविला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर : सिद्धार्थ गुप्ता हा पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा या भागात राहायला असून त्यानं आपलं इंजीनियरिंग व्हीआयटी कॉलेजमधून पूर्ण करून पुणे येथील एका कंपनीत काम केलं. त्यानंतर 2019 मध्ये सिद्धार्थने इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबाबत रिसर्च करायला सुरुवात केली. 2023 मध्ये त्याने आपला रिसर्च पूर्ण करून व्हीआरडी मोटर्स ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून सिद्धार्थने गुजरात आणि मध्यप्रदेश येथे ट्रॅक्टर बनवायला सुरुवात केली. 15 एच पी आणि 50 एच पी चं ट्रॅक्टर जून 2024 मध्ये पूर्णपणे बनविण्यात आलं असून याची ट्रायल देखील घेण्यात आली आहे. शिवाय सिद्धार्थच्या व्हीआरडी मोटर्सला आता पेटेंटही मिळालंय.

एआय सिस्टम वापरून विना चालक चालविता येणार : सिद्धार्थच्या व्हीआरडी मोटर्स या कंपनीनं बनवलेला 50 एच पी हा ट्रॅक्टर पूर्ण भारतीय बनावटीचा असून यात जी बॅटरी बनविण्यात आलीय ती देखील भारतीय बनावटीचीच आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सोलारवर चार्जिंग केली जाते. विशेष बाब म्हणजे या ट्रॅक्टरसोबत एक एक्स्ट्रा बॅटरीही देण्यात येते. त्यामुळं जरी वीज उपलब्ध नसली तरी ती बॅटरी चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चार्जिंग करता येऊ शकतो. एकदा चार्जिंग केल्यानंतर हा ट्रॅक्टर किमान दहा ते पंधरा तास चालू शकतो. ज्याच्या मदतीनं शेतातील सर्व कामं सहज करता येतील.

...म्हणून बनविला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर : याबाबत 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना सिद्धार्थ गुप्ता म्हणाला, "इंजीनियरिंग करत असताना मला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं आणि नेमकं काय करता येईल हेच शोधण्यासाठी मी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर होत असताना ट्रॅक्टर चालक तसंच डिझेल याबाबत समस्या येत होत्या. हीच बाब लक्षात घेऊन मी 2019 मध्ये रिसर्च सुरू केला आणि तेव्हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाबत माझ्या डोक्यात कल्पना आली. त्यावर मी लगेच काम सुरू केलं. आता एआयचा वापर करून 15 एच पी आणि 50 एच पी चा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनविण्यात आलाय त्यात विना चालक ट्रॅक्टर चालत असल्यानं शेतकऱ्यांना याची नक्कीच मोठी मदत होईल." तसंच यातील 15 एच पी या ट्रॅक्टरची किंमत तीन ते चार लाख रुपये असून 50 एच पी चं ची किंमत दहा ते बारा लाख रुपये एवढी आहे. सध्या देशातील गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात याची ट्रायल रन सुरू असून लवकरच हे ट्रॅक्टर बाजारात येणार असल्याचं यावेळी सिद्धार्थनं सांगितलं.

डिझेल बरोबरच चालकाचा खर्च वाचणार : देशातील तसंच राज्यातील अनेक भागात विजेचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो. शेतकऱ्यांना दिवसातून केवळ एक ते दोन तास वीज उपलब्ध होते. अशा परिस्थितीत एकदा या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला चार्जिंग केल्यावर तो ट्रॅक्टर दहा ते पंधरा तास काम करू शकतो. यामुळं शेतकऱ्यांचा डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार आहे, असंही सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा -

  1. भविष्यातील कामगिरीसाठी AI सज्ज : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचा उपक्रम - Leveraging AI
  2. एआय तंत्रज्ञानामुळं देशात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार? आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर - Economic Survey Report

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.