हैदराबाद : OpenAI, ChatGPT वापरकर्त्यांना आउटेज सामना करावा लागतोय. याबाबत कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. “आम्ही सध्या आउटेज अनुभवत आहोत. आम्ही आउटेजची समस्या ओळखली आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही तुम्हाला अपडेट सांगू”, असं कंपनीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
We're experiencing an outage right now. We have identified the issue and are working to roll out a fix.
— OpenAI (@OpenAI) December 12, 2024
Sorry and we'll keep you updated!
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस : ChatGPT ला आउटेज येत असल्यानं सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. गेल्या महिन्यात, चॅटजीपीटी 30 मिनिटांसाठी बंद झालं होतं. त्यानंतर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी X वर माफी मागितली होती. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, चॅटबॉटच्या अनुपलब्धतेमुळं 19,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. एक्स वरील पोस्टमध्ये आउटेज मान्य करताना, ऑल्टमन म्हणाले होते की कंपनी पूर्वीपेक्षा विश्वासार्हतेमध्ये खूप चांगलं काम करतेय, मात्र अजून बरेच काम आम्हाला करायचं आहे.
6 पर्याय जे तुम्ही लोकप्रिय AI चॅटबॉट ऐवजी वापरू शकता.
- Gemini
- Claude AI
- Microsoft Copilot
- Jasper AI
- Rytr
- Perplexity AI
मेटा आउटेज : दुसरीकडं इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबुकला जागतिक स्तरावर आउटेजचा सामना काल रात्री करावा लागला. मेटाचे प्रमुख प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांना आउटेजचा सामना करावा लागला. याबद्दल देखील वापरकर्त्यांनी तक्रार केलीय. त्यानंतर Meta नं समस्या मान्य करत, तांत्रिक समस्यावर काम करत असल्याचं म्हटंल होतं. "आमच्या ॲप्समध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांच्या अडचणी येत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याचं निराकरण करण्यासाठी काम करत आहोत. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” असं कंपनीनं म्हटलं होतं.
हे वाचलंत का :