हैदराबाद PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी टाटा सन्स तसंच तैवानस्थित पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनच्या टीमसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांची प्रगती तसंच भविष्यातील योजनांवर चर्चा करणं हा या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू होता. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'X'वर पोस्ट केलीय. 'टाटा सन्स तसंच पीएसएमसीच्या टीमसोबत चांगली बैठक झाली. त्यांनी त्याच्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांची अपडेट्स शेअर केली. PSMC नं भारतात त्यांचा व्यावसाय वाढवण्यासाठी तयारी दर्शवलीय.
टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रस्तावाला मंजुरी : भारत सरकारने ढोलेरा येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यापूर्वी, भारत सरकारनं PSMC च्या भागीदारीत गुजरातमधील धोलेरा येथे मेगा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा तयार करण्याच्या Tata Electronics च्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 91 हजार कोटी रुपये (सुमारे US$11 अब्ज) असेल. ज्यामुळं या प्रदेशात 20 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. Tata Electronics, Tata Sons ची उपकंपनी, Powerchip Semiconductor Manufacturing Corporation (PSMC) च्या सहकार्यानं भारतातील पहिलं AI-सक्षम अत्याधुनिक फॅब स्थापित करत आहे.
Had a great meeting with the leadership team of Tata Sons and PSMC. They shared updates on their Semiconductor manufacturing projects. PSMC expressed enthusiasm to further expand its footprint in India. pic.twitter.com/uyriq9qiLb
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2024
50 हजार वेफर्सची उत्पादन क्षमता : फॅबमध्ये दरमहा 50 हजार वेफर्सची उत्पादन क्षमता असेल. कंपनी मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करेल. नवीन सेमीकंडक्टर फॅब पॉवर मॅनेजमेंट IC, डिस्प्ले ड्रायव्हर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स (MCUs) सारखी उत्पादनं तयार करण्यात मदत करेल. जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत भारताला महत्त्वाचं स्थान मिळवून देण्याच्या दिशेनं, हे पाऊल उचललं जात आहे. बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय उद्योगाच्या विकासासाठी आणि स्वावलंबनासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलंय.
भारताच्या तांत्रिक प्रगतीला चालना : सेमीकंडक्टर उद्योग हा भारताच्या तांत्रिक प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या विकासामुळं केवळ रोजगारनिर्मिती होणार नाही, तर देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची त्याची भूमिका बजावेल, असं मोदी म्हणाले. टाटा समूह आणि PSMC यांच्यातील ही भागीदारी भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन संधी निर्माण करतेय. यातून देशातील डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढीला आणखी गती मिळेल.
- हे वाचलंत का :
आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - Muft Bijli Yojana - Tata Motors दणका; कार मालकाला 16.95 लाख रुपये परत करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? - Hyderabad Nexon EV fire case
- DRDO-IIT दिल्लीनं केलं 'ABHED' बुलेट प्रुफ जॅकेट्स विकसित - ABHED Bullet Proof Jackets