नवी दिल्ली PM Modi On AI : मंगळवारी इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करण्याचं आवाहन केलंय. आपल्या उद्घाटन भाषणात, मोदींनी उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधक आणि स्टार्टअप्सना AI आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करण्यास सांगितलंय.
AI साठी जागतिक मानकं : "AI आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करून विविध देशांच्या विविधतेचा देखील आदर केला पाहिजे,"असं पंतप्रधान म्हणाले. आमच्याकडं विमान वाहतूक क्षेत्रासाठी जागतिक मानदंड आहे. त्यामुळं आम्हाला डिजिटल क्षेत्रासाठी समान फ्रेमवर्कची आवश्यकता आहे." ज्याप्रमाणे आम्ही विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका मापडंत तयार केलंय, त्याचप्रमाणे डिजिटल क्षेत्रात देखील अशीच नियमांची आवश्यकता, असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
India has made the world of technology inclusive. At the same time, it has leveraged the power of technology to further women empowerment. This can be seen across sectors in India. pic.twitter.com/bLzYwNOuMI
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2024
राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण : पीएम मोदींनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंबली (WTSA) ला यावर काम करण्यास सांगितलंय. विविध देशांच्या विविधतेचा आदर करण्यासाठी नैतिक एआय आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक नियम तयार करावे, असं मोदी म्हणाले. "WTSA च्या प्रत्येक सदस्यानं दूरसंचार सुरक्षित कसं बनवू शकतो, यावर विचार करण्याची गरज आहे. भारताचा डेटा संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण सुरक्षित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं मोदी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
India has made the world of technology inclusive. At the same time, it has leveraged the power of technology to further women empowerment. This can be seen across sectors in India. pic.twitter.com/bLzYwNOuMI
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2024
जागतिक मार्गदर्शक तत्त्वे : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये G-20 चे अध्यक्षपद भूषवताना भारतानं हा मुद्दा जगासमोर मांडला होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "मलाही WTSA सारख्या जागतिक व्यासपीठासमोर हा मुद्दा मांडायचा आहे. हा मुद्दा डिजिटल तंत्रज्ञानाच्या जागतिक चौकटीचा आहे. यासाठी जागतिक मार्गदर्शक तत्त्वे आता अस्तित्वात आहेत." त्याचं महत्त्व जागतिक पातळीवर स्वीकारावं लागेल, असं ते म्हणाले.
India's strides in the world of telecom are a global case study. For us, this sector is not merely about connectivity - it is as much about equity and opportunity. We have emphasised on a 'Digital First' approach which has led to substantial benefits. pic.twitter.com/ixl6xMXDv8
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2024
सायबर धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण : पीएम मोदी म्हणाले की, आज उपलब्ध असलेली आणि वापरली जाणारे सर्व डिजिटल टूल्स आणि ॲप्लिकेशन्स देशाच्या सीमेपलीकडे आहेत. त्यामुळं कोणताही देश केवळ सायबर धोक्यांपासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करू शकत नाही. यासाठी सर्व जागतिक संस्थांनी काम करण्याची गरज आहे. " यासाठी आपल्याला एकत्र काम करावं लागेल, जागतिक संघटनांना पुढं येऊन जबाबदारी स्वीकारावी लागेल", असं मोदींनी यावेळी सांगितलं.
हे वाचलंत का :