हैदराबाद ChatGPT search engine feature : OpenAI नं त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ChatGPT साठी एक नवीन वैशिष्ट्य जाहीर केलं आहे. हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांचा चॅट इतिहास शोधण्याची (search) मदत करणार आहे. वापरकर्त्यांना जुन्या चॅट्समधून त्यांना आवश्यक असलेली माहिती पुन्हा या फिचरमुळं शोधता येणार आहे. सध्या, हे वैशिष्ट्य फक्त ChatGPT च्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. सध्या हे फिचर ChatGPT Plus वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. त्यानंतर येत्या काही महिन्यात हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी खूल करण्यात येणार आहे.
🌐 Introducing ChatGPT search 🌐
— OpenAI (@OpenAI) October 31, 2024
ChatGPT can now search the web in a much better way than before so you get fast, timely answers with links to relevant web sources.https://t.co/7yilNgqH9T pic.twitter.com/z8mJWS8J9c
ChatGPT मध्ये चॅट इतिहास शोध वैशिष्ट्य : ChatGPT नं एक नवीन शोध वैशिष्ट्य लाँच केलं आहे. जे वापरकर्त्यांना AI चॅट इंटरफेसमध्ये रिअल टाइम सर्च करण्याची परवाणगी देणार आहे. स्पोर्ट्स स्कोअरपासून स्टॉक अपडेट्सपर्यंत सर्वकाही कव्हर करून, हे वैशिष्ट्य संभाषणात्मक AI आणि वेळेवर माहितीमधील अंतर कमी करणार आहे. पारंपारिक शोध इंजिन आणि चॅट प्लॅटफॉर्ममध्ये वारंवार स्विच करण्याची आता गरज पडणार नाहीय.
चॅट इतिहास शोध वैशिष्ट्य : X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये, OpenAI च्या अधिकृत खात्यावर या नवीन वैशिष्ट्याची घोषणा केली. जुन्या चॅट्स संग्रहित केल्या जात असल्यानं वापरकर्ते या वैशिष्ट्यासाठी बर्याच काळापासून वाट पाहत होते, कारण जुन्या चॅट्सचा शोध घेणं कठीण काम होतं. या नवीन चॅट इतिहास शोध वैशिष्ट्यासह, वापरकर्ते आता विंडोच्या डाव्या बाजूला असलेल्या ChatGPT वेबच्या साइड पॅनेलवर एक नवीन भिंगाचं चिन्ह पाहू शकतात. वापरकर्ते या चिन्हावर टॅप करू शकतात. ज्यात मागील चॅट शोधण्यासाठी विशिष्ट कीवर्ड टाइप करू शकतात.
फ्री व्हर्जन येणार : हे वैशिष्ट्य सध्या ChatGPT Plus आणि टीम वापरकर्त्यांसाठी आणलं जात आहे. ओपनएआयनं असंही म्हटलं आहे, की वैशिष्ट्य एका आठवड्यात येणार आहे. मात्र फ्री व्हर्जन असलेल्या युजर्सना हे फीचर पाहण्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हे वाचलंत का :