हैदराबाद CTO Mira Murati resigns : Chat GPIT निर्माता OpenAI च्या 3 प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी CTO मीरा मुराती, उपाध्यक्ष-संशोधन बॅरेट जोफे तसंच मुख्य संशोधन अधिकारी बॉब मॅकग्रू यांचा समावेश आहे. या लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट केलीय.
वैयक्तिक कारणामुळं दिला राजीनामा : OpenAI च्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) मीरा मुराती यांनी म्हटलंय की, "स्वतःसाठी वेळ देण्यासाठी तसंच वैयक्तिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनी सोडत आहे". यासोबतच ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, "कंपनीचे मुख्य संशोधन अधिकारी बॉब मॅकग्रो आणि आणखी एक प्रमुख संशोधक बॅरेट झॉफ देखील कंपनी सोडत आहेत".
I shared the following note with the OpenAI team today. pic.twitter.com/nsZ4khI06P
— Mira Murati (@miramurati) September 25, 2024
मीरा मुराती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे सांगितलं की, हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप कठीण होतं, परंतु बराच विचार केल्यानंतर मी हे पाऊल उचललंय. “मला माझ्या वैयक्तिक शोधासाठी वेळ द्याचा आहे."
ओपनएआयचं कौतुक : मीरा मुराती यांनी ओपनएआयचं कौतुक करताना म्हटंल, कंपनी AI इनोव्हेशनच्या शिखरावर पोहचीलय. त्यामुळं कंपनी सोडणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. माझा सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अद्वितीय राहीलाय. तसंच कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन, अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी समर्थन केल्याबद्दल मुराती यांनी त्यांचे आभार मानलेय. "कंपनीच्या सहकार्यसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आम्ही एकत्रितपणे वैज्ञानिक सीमा ओलांडल्या आहेत. मानवी कल्याण सुधारण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. मी यापुढे तुमच्यासोबत नाही नसेल. मात्र, मी तुम्हाला शुभेच्छा देतो.", अशा भावना त्यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलीय.
सीईओनी मानले आभार : सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही मीरा मुराती यांच्या योगदानाचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. नैसर्गिक प्रक्रिया वेगानं वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये नेतृत्व बदलांसह होते, असं ऑल्टमन यांनी म्हटलं आहे. कंपनीचा पुढील आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, असं ते म्हणाले.ऑल्टमननं पोस्टमध्ये लिहिलंय, "मीरा मुराती यांनी केलेल्या कामामुळं कंपनीला पुढे नेण्यात मदत झाली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, परंतु सर्वात कठीण काळात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल मी वैयक्तिकरित्या त्यांचा आभारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी उत्साहित आहे." मीरा मुराती यांना राजीनाम्यामुळं, ओपनएआय नवीन नेतृत्वाच्या शोधाची तयारी करत आहे. परंतु त्यांनी कंपनीत दिलेलं योगदान, त्यांच नेतृत्व नेहमीच स्मरणात राहील".
हे वाचलंत का :