OnePlus ने भारतात ग्रीन लाइन चिंता-मुक्त सोल्यूशन सादर केले, ग्राहकांना याचा फायदा होईल.
हैदराबाद : वनप्लसनं आज एक नवीन उपाय सादर केला आहे. याद्वारे भारतातील स्मार्टफोनमधील AMOLED डिस्प्लेवर हिरव्या रंगाच्या रेषांची समस्या दूर करण्यात येणार आहे. या उपक्रमाला 'OnePlus Green Line Worry-Free Solution' असं नाव देण्यात आलं आहे. प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि वापरकर्त्यांना आजीवन वॉरंटी यात मिळणार आहे.
- वनप्लस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लिऊ म्हणाले, “भारतीय बाजारपेठेतील फोनमधील जोखीम कमी करण्यासाठी तांत्रिक उपायांसह त्वरित प्रतिसाद देणारा वनप्लस हा उद्योगातील पहिला ब्रँड होता.” “आम्ही केवळ AMOLED डिस्प्लेमध्ये तंत्रज्ञान सुधारणांना गती देत नाही, तर भारतीय वापरकर्त्यांसाठी आजीवन वॉरंटी देणारा पहिला ब्रँड देखील आहोत.”
प्रगत तंत्रज्ञान : वनप्लसनं विशेषत: पर्यावरणीय घटकांमुळं उद्भवलेल्या तांत्रिक आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्योगाततंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सर्वांत मोठी प्रगती म्हणजे एन्हांस्ड एज बाँडिंग लेयरचं एकत्रीकरण, जे सर्व OnePlus AMOLED डिस्प्लेमध्ये उत्कृष्ट PVX एज-सीलिंग सामग्री वापरतं. PVX हे उच्च-कार्यक्षमतेचं साहित्य आहे, जे हवामान आणि रसायनांविरुद्धच्या अपवादात्मक प्रतिकारासाठी लोकप्रिय आहे, ज्यामुळं ते अत्यंत परिस्थितीत टिकाऊपणासाठी महत्वाचं मानलं जातं.
गुणवत्ता नियंत्रण : OnePlus ची गुणवत्तेशी बांधिलकी दिसून येते. OnePlus गुणवत्ता अभियांत्रिकी लॅब सर्व फोनवर 180 पेक्षा जास्त व्यापक चाचण्या घेतं. त्यामुळं विश्वासार्हता आणि टिकाऊपणा तसंच वास्तविक-जगातील परिस्थितींचं अनुकरण होतं. या चाचण्यांमध्ये विद्युत कार्यक्षमतेची तपासणी, संरचनात्मक मूल्यांकन आणि पर्यावरणीय वृद्धत्व मूल्यमापन यांचा समावेश होतो. प्रमुख चाचण्यांपैकी एक म्हणजे 'डबल 85' चाचणी, जिथे डिस्प्ले 85°C तापमान आणि 85% आर्द्रता वाढीव कालावधीसाठी ठेवला जातो. त्यातून याचं मुल्यमापन करता येतं.
आजीवन हमी : OnePlus सर्व स्मार्टफोन्सवर ग्रीन लाईन्स समस्यांसह आजीवन वॉरंटी प्रदान करेल, मग वापरकर्ते नवीन फोन वापरत असतील किंवा जुने. याचा अर्थ वापरकर्त्यांना डिस्प्ले समस्यांबद्दल काळजी करण्याची आता गरज नाही.
हे वाचलंत का :