हैदराबाद : OnePlus नं स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप सह आपला नवीन नेक्स्ट जनरेशन OnePlus 13 फोन लॉंच केला. OnePlus सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह आपला नवीन फ्लॅगशिप किलर फोन बाजारात आणला आहे. OnePlus 13 स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच करण्यात आला आहे. तो काही दिवसातच भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. याशिवाय, हा फोन आगामी काळात इतर बाजारपेठांमध्ये देखील लॉंच होऊ शकतो.
OnePlus 13 launched in China!
— OnePlus Club (@OnePlusClub) October 31, 2024
💰 𝗣𝗿𝗶𝗰𝗶𝗻𝗴:
• 12GB+256GB: ¥4499 ~₹53,000/$632/€582
• 12GB+512GB: ¥4899 ~₹57,800/$688/€633
• 16GB+512GB: ¥5299 ~₹62,600/$744/€685
• 24GB+1TB: ¥5999 ~₹70,800/$842/€775#OnePlus #OnePlus13 pic.twitter.com/w1zO2LCNkv
OnePlus 13 चे डिझाइन : डिझाईनच्या बाबतीत फोन वनप्लस 12 सारखाचा हा फोन दिसतोय. OnePlus 13 आणि OnePlus 12 तुम्हाला जवळपास सारखेच दिसतील. याच्या मागील बाजूस कॅमेरा देण्यात आला असून फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे.
OnePlus 13 pricing
— OnePlus Club (@OnePlusClub) October 31, 2024
OnePlus 13 starts at ¥4499 for 12GB+256GB
The top-end 24GB+1TB is only ¥5999! It's really a steal 🔥 pic.twitter.com/FXtBmfjsrM
OnePlus 13 ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत : OnePlus 13 मध्ये 6.82-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 2K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर लॉंच करण्यात आला आहे. OnePlus 13 दोन प्राइम कोर 4.32 GHz वर चालतो आणि सहा परफॉर्मन्स कोर 3.53 GHz वर चालतो. OnePlus ने चीनमध्ये 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह डिव्हाइस सादर केला आहे. फोन नवीनतम Android 15 तसंच OxygenOS 15 ला देखील समर्थन करतो.
ट्रिपल कॅमेरा सेटअप : फोटोग्राफीसाठी, तुम्हाला OnePlus 13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, या सेटअपमध्ये OIS सह 50MP मुख्य कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 50MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्सचा समावेश आहे. नवीन OnePlus 13 मध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 100-वॉट फास्ट चार्जिंग, 50-वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट करते. चीनमध्ये OnePlus 13 ची सुरुवातीची किंमत CNY 4,499 (सुमारे ₹ 53,000) आहे.
हे वाचलंत का :