हैदराबाद : स्मार्टफोन कंपनी नथिंग आपला पहिला कम्युनिटी एडिशन स्मार्टफोन 30 ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार आहे. नथिंग फोन 2a कम्युनिटी एडिशनसाठी ग्राहकांकडून कल्पना मागवण्यात आल्या होत्या. यात अनेकांनी हार्डवेअर, वॉलपेपर, पॅकेजिंग डिझाइन आणि फोनच्या मार्केटिंग मोहिमेत भाग घेतला आहे. फोनच्या अंतिम डिझाइनमध्ये एक अद्वितीय "फॉस्फोरेसेन्स" संकल्पना आहे, ज्यामध्ये आकर्षक हिरवा रंग आहे. या रंगामुळं फोन अंधारातही चमकतोय.
चमकणार फायरफ्लाय डिझाइन : हा फोन तयार करण्यासाठी मार्चमध्ये सुरवात करण्यात आली होती. यामध्ये हार्डवेअर डिझाइन फायनल करण्यात आलं. यात मागील बाजूस चमकदार रेडियम पॅटर्न कंपनीनं दिला आहे. नवीन फोनच्या लॉंच टीझरमध्ये मागील बाजूस एक चमकणारा फायरफ्लाय डिझाइन देखील पहायला मिळतंय. या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 6.7-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे. नवीन Phone 2a आवृत्ती बाहेरून वेगळी दिसत असली तरी ती या वर्षी मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या मानक Nothing Phone (2a) सारखीच असण्याची अपेक्षा आहे. बेस मॉडेलमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले ॲडॉप्टिव्ह 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 7200 Pro SoC होता.
Community spirit.
— Nothing (@nothing) October 15, 2024
Join us for our next big reveal. 30 October, 11:00 GMT. pic.twitter.com/lmsBFRlNQk
IP54 धूळ आणि पाणी-प्रतिरोधक रेटिंग : ऑप्टिक्सबद्दल बोलायचं झाल्यास, डिव्हाइसमध्ये मागील बाजूस 50MP ड्युअल कॅमेरा आहे. फोटो आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, डिव्हाइसमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे. ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.3 आणि NFC यांचा समावेश आहे. शिवाय, फोन IP54 धूळ पाणी-प्रतिरोधक आहे. किंमतीबद्दल बोलयचं झाल्यास कम्युनिटी एडिशनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
'हे' वाचलंत का :