ETV Bharat / technology

नोएडामध्ये 76 मुला-मुलींना अटक, बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश - NOIDA BUST FAKE CALL CENTRE

नोएडा पोलिसांनी अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या 76 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी एक कॉल सेंटरच्या माध्यामातून नागरिकांची फसवणूक करत होते.

Representative photo
प्रातिनिधिक छायाचित्र (ETV BHARAT MH File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 14, 2024, 1:12 PM IST

Updated : Dec 14, 2024, 1:18 PM IST

हैदराबाद : नोएडा पोलिसांनी शुक्रवारी अमेरिकन नागरिकांना फसवणारे आणखी एक कॉल सेंटर उघडकीस आणलं आहे. या प्रकरणात आतपर्यंत 76 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 67 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. तांत्रिक सहाय्य आणि कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली बनावट संदेश आणि लिंक पाठवून आरोपी अमेरिकन नागरिकांना फसवत होते. फसवणुकीच्या या टोळीतील चार प्रमुखांनाही पोलिसांनी पकडलं आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी अनेक जण आधीच तुरुंगात गेले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन, राउटर आणि अमेरिकन बँकांच्या बनावट चेकसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

"सेक्टर-63 च्या ई ब्लॉकमध्ये इन्स्टा सोल्युशनच्या नावानं एक कॉंल सेंटर सुरू होतं. या टोळीनं आतापर्यंत 1500 हून अधिक अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली आहे. आरोपी एका प्रक्रियेअंतर्गत परदेशी नागरिकांकडून 99 ते 500 अमेरिकन डॉलर्स घेत होते. गिफ्ट कार्ड आणि इतर माध्यमातून त्यांच्याककडून पैसे उकळले जात होते. हे पैसे हवालाद्वारे भारतात येत होते. टोळीत सहभागी असलेल्या इतर आरोपींबद्दलही माहिती गोळा केली जात आहे. सायबर टीमच्या मदतीनं आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचं डेटा विश्लेषण केलं जात आहे". - शक्ती मोहन अवस्थी, डीसीपी सेंट्रल नोएडा

कशी झाली फसवणूक?: या आरोपी टोळीचे प्रमुख कुरुनल रे, सौरभ राजपूत, सादिक ठाकूर आणि साजिद अली आहेत. हे चौघेही यापूर्वी गुजरातमध्ये तुरुंगात गेले आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की ते ऑनलाइन कंपनी सपोर्ट, मायक्रोसॉफ्ट, टेक सपोर्ट आणि पे डेच्या नावाखाली कॉल सेंटरमधून फसवणूक करत असत. कॉल सेंटरचे विभाग बनवण्यात आले होते. टोळीचे सदस्य स्काईप ॲपद्वारे ग्राहकांचा वैयक्तिक डेटा खरेदी करत असत. त्याचे पेमेंट USDT मध्ये केलं जात होतं. डेटा आल्यानंतर, आरोपी अमेरिकन नागरिकांच्या संगणकात बग पाठवत असत. एकाच वेळी दहा हजार लोकांना मेल किंवा मेसेज पाठवले जात होते.

अमेरिकन डॉलर्सची मागणी : या बगमुळं संगणकात बिघाड होत होता. त्यामुळं संगणकाची स्क्रीन निळी दिसत होती. यानंतर, स्क्रीनवर एक नंबर दिसत होता. अमेरिकन नागरिक त्या नंबरवर कॉल करायचे आणि आरोपी हा कॉल कॉल सेंटरच्या सर्व्हरवर घेत असत. कॉल सेंटरमध्ये बसलेला आरोपी परदेशी नागरिकांचे कॉल उचलत असे. त्यानंतर ते मायक्रोसॉफ्टचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांची समस्या सोडवण्यासाठी 99 किंवा त्याहून अधिक अमेरिकन डॉलर्सची मागणी करत असे. पैसे भरल्यानंतर, पीडितांना एक कमांड सांगितली जात होती, ज्यामुळं काही मिनिटांत संगणक दुरुस्त होत असे. ही सर्व प्रक्रिया परदेशी नागरिकांची फसवणूक करून पैसे कमविण्यासाठी केली जात असे.

स्काईप ॲपवरून घेतला डेटा : आरोपी स्काईप ॲपवरून डेटा विकत घेत असत. त्यात अमेरिकन नागरिकांची माहिती होती. आरोपी कोणत्या ना कोणत्या साइटवर कर्जासाठी अर्ज केलेल्या नागरिकांचा डेटा घेत असत. डेटा मिळवल्यानंतर, आरोपी अमेरिकन नागरिकांच्या मोबाईलवर कर्जाबाबत संदेश पाठवत असे. त्यानंतर कर्ज मंजूर करण्यासाठी शंभर ते पाचशे डॉलर्सची मागणी केली जात असे.

अमेरिकन नागरिकांची फसवणूक : डेटा मिळवल्यानंतर, आरोपी परदेशी ग्राहकांना व्हॉइस नोट्स पाठवत असे. यामध्ये, ग्राहकांना त्यांचे पार्सल डिलिव्हरीसाठी तयार असल्याचं सांगितलं जात असे. जर ग्राहकानं सांगितलं की त्यानं पार्सल ऑर्डर केलं नाही, तर आरोपी त्याचे खातं चोरीला गेल्याचं सांगत असे.

हे वाचलंत का :

  1. फ्लिपकार्ट तसंच मिंत्राचा ग्राहकांना दणका, ऑर्डर रद्द केल्यास द्यावं लागणार शुल्क?
  2. Xiaomi Redmi Note 14 मालिकेचा सेल लाईव्ह, तिन्ही स्मार्टफोन मिळतेय बँक ऑफर्स
  3. POCO X7 Neo लवकरच भारतात लॉंच होण्याची शक्यता

Last Updated : Dec 14, 2024, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.