हैदराबाद New Triumph Motorcycle Launched : Triumph India नं आज नवीन बाईक Triumph Speed T4 लाँच केली. कंपनीनं नवीन Speed T4 ची सुरुवातीची किंमत 2.17 लाख रूपये ठेवली आहे. ही सर्वात स्वस्त ट्रायम्फ बाइक आहे, जी तुम्ही भारतात खरेदी करू शकता. कंपनीनं एकूण तीन रंगांमध्ये स्पीड टी4 दुचाकी सादर केलीय. ज्यामध्ये पांढरा, लाल आणि काळा रंगांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन ट्रायम्फ स्पीड T4 मध्ये काय खास आहे.
तीन रंगात उपलब्ध : लूकच्या बाबतीत, स्पीड T4 जवळजवळ स्पीड 400 सारखीच आहे. गोल एलईडी हेडलॅम्प, शिल्पित इंधन टाकी, सिंगल-पीस सॅडल, अलॉय व्हील, टेल लॅम्प आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. तथापि, स्पीड T4 मेटॅलिक व्हाईट, फँटम ब्लॅक आणि कॉकटेल रेड वाईनसह विविध रंग पर्याय आणि ग्राफिक्समध्ये ऑफर केली आहे.
399 सीसी क्षमतेचं इंजिन : बाईकमध्ये 399 सीसी क्षमतेचं सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरण्यात आलं आहे. जे 30.6bhp पॉवर आणि 36Nm टॉर्क जनरेट करतं. 2500rpm वर 85 टक्के टॉर्क येतो असा कंपनीचा दावा आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे.
दुचाकीसाठी बुकिंग सुरू : वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं, तर बाइकमध्ये ऑल-एलईडी डिस्प्ले, ॲनालॉग-डिजिटल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. ट्रायम्फनं त्याच्या अधिकृत वेबसाइटवर स्पीड T4 साठी बुकिंग सुरू केलं आहे. त्याची डिलिव्हरी काही दिवसांत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का :