हैदराबाद New Kia Carnival booking starts : Kia India भारतीय बाजारात Kia Carnival लाँच करणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी ही कार भारतीय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मात्र, त्या आगोदरचं कंपनीकडून कारची बुकींग करण्यात येत आहे. नवीन कार्निवल एमपीव्हीचं बुकिंग सुरू करण्याची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार, किया कार्निवलचं बुकिंग 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवीन Kia कार्निवल भारतात कोणत्या फिचरसह लॉन्च होईल, काय त्यात खास असेल जाणून घेऊया.
नवीन किया कार्निवल बुकिंग : कंपनीकडून नवीन कार्निव्हलसाठी बुकिंग 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. यासाठी कंपनीनं दोन लाख बुकींग प्राईज निश्चित केली आहेत.
किया कार्निवल फिचर : नवीन कार्निव्हल लाँच करण्यापूर्वी कंपनीनं एक टीझर देखील जारी केला आहे. ज्यामध्ये कारचे काही फिचर समोर आली आहेत. ज्यामध्ये ड्युअल सनरूफ, व्हेंटिलेशन, लेग सपोर्ट, दुसऱ्या रांगेतील इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स, पॉवर स्लाइडिंग डोअर्स, 12-स्पीकर बोस साउंड सिस्टम, 12.3-इंच ड्युअल वक्र डिस्प्ले, ADAS लेव्हल 2 यांसारख्या वैशिष्ट्यांसह कार सुसज्ज असेल. याशिवाय, हेड-अप डिस्प्ले, डिजिटल रियर-व्ह्यू मिरर, फिंगरप्रिंट रेकग्निशनसह अपडेटेड डिजिटल की आणि डॅशबोर्डवर ॲम्बियंट लाइटिंग देखील उपलब्ध असेल.
रंग पर्याय : नवीन कार्निव्हल फक्त एकाच पूर्ण लोड व्हेरियंटमध्ये लॉन्च केलं जाईल. कलर ऑप्शन्स बद्दल बोलायचं झालं, तर हे दोन किंवा तीन कलर ऑप्शन्समध्ये ऑफर केलं जाऊ शकतं.
इंजिन : भारतात लॉन्च होणाऱ्या नवीन कार्निव्हलमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध कार्निव्हल 1.6-लिटर टर्बो पेट्रोल हायब्रिड आणि 3.5-लीटर V6 पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध आहे.
किया कार्निवल किंमत : भारतात लॉन्च होणाऱ्या कार्निव्हलची किंमत सुमारे ५० लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारतात ती इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेलफायरशी स्पर्धा करताना दिसणार आहे.
हे वाचलंत का :