ETV Bharat / technology

नवीन Jawa 42 FJ बाईक Rs 1.99 लाखात, बुकींग सुरू, जाणून घ्या Jawa 42 FJ चे फिचर - Jawa 42 FJ launched in India

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 3, 2024, 4:57 PM IST

Updated : Sep 3, 2024, 5:17 PM IST

Jawa 42 FJ launched in India : Jawa Yezdi Motorcycles नं नवीन Jawa 42 FJ मोटरसायकल लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे. Jawa 42 FJ हे '42' लाइनअपमधील एक स्पोर्टियर आणि अधिक शक्तिशाली मॉडेल आहे.

New Jawa 42 FJ motorcycle launched
नवीन Jawa 42 FJ बाईक (Jawa)

हैदराबाद : Jawa Yezdi Motorcycles नं नवीन Jawa 42 FJ मोटरसायकल लाँच केली आहे.Jawa 42 FJ हे '42' लाइनअपमधील एक स्पोर्टियर आणि अधिक शक्तिशाली मॉडेल आहे. इतर जावा 42 मोटारसायकलच्या तुलनेत यात बरेच बदलही करण्यात आले आहेत. कंपनीनं लॉन्चसोबतच त्याची बुकिंग सुरू केली आहे. त्याची डिलिव्हरीही लवकरच सुरू होणार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची थेट स्पर्धा Royal Enfield Huntak 350 आणि Honda CB350 सारख्या मॉडेल्सशी होईल.

Jawa 42 FJ ची वैशिष्ट्ये : Jawa 42 FJ मध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 21.45bhp पॉवर आणि 29.62Nm टॉर्क जनरेट करतं. स्लिप आणि असिस्ट क्लचसह इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. मात्र, त्याचे मायलेजचे आकडे समोर आलेले नाहीत. रिअल वर्ल्ड मायलेज येत्या काही दिवसांत त्याच्या रिव्ह्यूमध्ये समोर येईल.

आधुनिक रेट्रो थीम : Jawa 42 FJ च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं, तर या मोटरसायकलमध्ये आधुनिक रेट्रो थीम दिसत आहे. त्याच्या बाजूला ॲल्युमिनियम प्लेट असलेली टीयर ड्रॉप आकाराची इंधन टाकी उपलब्ध आहे. साइड पॅनेल्स ब्रँडच्या इतर Jawa 42 प्रमाणेच आहेत. मागील फेंडरमधून जावा टेल, फेंडर देखील आहेत.

स्पोर्टी लुक : यामध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, ब्लॅक-आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाईप बाईकचा स्पोर्टी लुक वाढवतात. बेस मॉडेलला वायर-स्पोक व्हील मिळतात. तुम्ही ते 5 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकाल. त्याच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात एलईडी लाईट, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि सिंगल-पॉड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. ही मोटरसायकल स्टील चेसिस वापरते, जी 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक जोडलेली आहे. ब्रेकिंग आणि सुरक्षेसाठी, समोर 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक आहे. या मोटरसायकलमध्ये ड्युअल-चॅनल ABS मानक उपलब्ध आहे.

हे वाचलंत का :

  1. नवीन Royal Enfield Classic 350 चे बुकिंग सुरू, जाणून घ्या किंमतीसह फिचर - 2024 Royal Enfield Classic 350
  2. पाण्यात देखील चालतात 'या' पाच कार, ग्रामीण भागासाठी ठरताय वरदान - Highest Water Wading Capacity SUVs
  3. इलेक्ट्रिक वाहनावर 10 हजारांची सूट, 'ही' आहे शेवटची तारीख - Discount on Electric Scooters

Last Updated : Sep 3, 2024, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.