ETV Bharat / bharat

जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; पाच आरोपींना अटक - Mass Murder In Sukma

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 5:31 PM IST

Mass Murder In Sukma : सुकमा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (Five Killed in Sukma) करण्यात आली. सुकमाचे एस पी किरण चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेतील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Mass Murder In Sukma
एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या (ETV BHARAT GFX)

सुकमा Mass Murder In Sukma : बस्तरच्या सुकमा येथे एकाच वेळी पाच जणांची हत्या (Five Killed in Sukma) करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सुकमाच्या कोंटा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हत्येनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. कोंटा येथील एतकल येथे ही घटना घडली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

रविवारी सकाळी घडली घटना : ही संपूर्ण घटना रविवारी सकाळी घडली आहे. सुकमाच्या कोंटा अंतर्गत एतकल गावात पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण एवढी जबर होती की त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना काठीनं बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती, किरण चव्हाण यांनी दिली.

"रविवारी सकाळी जादूटोण्याच्या संशयावरून गावातील पाच जणांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सुकमाच्या एतकल गावात घडली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर सदरील घटनेतील आरोपी हे गावात राहणारे आहेत". - किरण चव्हाण, एसपी

सुकमा ते बस्तरपर्यंत पोलिसांची कारवाई : या हत्येनंतर सुकमा ते बस्तरपर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोंटा पोलिसांव्यतिरिक्त सुकमाचे एसपी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही स्थानिक पोलिसांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे.

हेही वाचा -

  1. तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून; लग्नाच्या तगाद्यामुळे मारेकऱ्यानं केला 'गेम', जाणून घ्या पोलिसांनी कसा लावला 6 तासात छडा - Transgender Murder In Satara
  2. जळगाव हादरलं! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन डोकं दगडानं ठेचलं; 'नराधमाला फाशी द्या' संतप्त जमावाची मागणी - Minor Girl Rape Murder Case
  3. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.