ETV Bharat / state

राज्यात सत्ता दिली तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरेंचं जनता जनार्दनाला आश्वासन - Uddhav Thackeray In Shirdi - UDDHAV THACKERAY IN SHIRDI

Uddhav Thackeray In Shirdi : उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डीतील कोपरगाव इथं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आयोजित महाअधिवेशनात हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवत आमचं सरकार आणा, तुमची मागणी मान्य करतो, असं आश्वासन दिलं.

Uddhav Thackeray In Shirdi
उबाठा गटप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 5:07 PM IST

Updated : Sep 15, 2024, 5:24 PM IST

शिर्डी Uddhav Thackeray In Shirdi : महायुतीला सत्तेपासून दूर ठेवा, आमचं सरकार आणा, मग जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य करतो, असं आश्वासन उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. शिर्डीतील कोपरगाव इथल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आयोजित महाअधिवेशनात आज उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. "कोणाला किती पेन्शन मिळते मला माहिती नाही, मी अजून रिटायर झालो नाही. मला कोणीही सत्तेतून रिटायर करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं कुठं सत्ता होती. तरी पण त्यांच्याकडं जनतेची सत्ता होती. तशी ही जनताच माझी सत्ता आहे," असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

लाडके भाऊ नाही, हे तर फुकट खाऊ : जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आज कोपरगावात महाअधिवेश आयोजित करण्यात आलं. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "कर्मचाऱ्यांनी साथ दिली नाही, तर सरकार चालू शकत नाही. योजना आम्ही राबवतो, मात्र या योजना तुम्ही घरोघरी जाऊन योजना पोहोचवण्याचं काम करता. याचं श्रेय हे घेतात आणि म्हणतात सरकार आपल्या दारी," अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली. "लाडकी बहीण योजना आणली. मात्र लाडका भाऊ कोणाला म्हणायचं ? हे म्हणतात मीच तुझा भाऊ, हे सगळे फुकट खाऊ. पैसा जनतेचा आहे आणि हे फुकट खाऊ आहेत," असाही टोला लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीला उद्धव ठाकरेंनी लागवला.

राज्यात सत्ता दिली तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, उद्धव ठाकरेंचं जनता जनार्दनाला आश्वासन (Reporter)

निवडणूक जवळ आल्यानं लाडकी बहीण योजना : "ज्यांना बहीण आहे हेच माहिती नव्हते, त्यांना आता निवडणूक जवळ आल्यानं बहीण आठवली. त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना काढलीय," असाही टोला उद्धव ठाकरेंनी महायुतीला लागवलाय. "कोरोना महामारीच्या काळात सर्व कामगारांनी जिवावर उदार होऊन कामं केलीत, म्हणून महाराष्ट्र वाचला आहे. तरी सुद्धा हे सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही."

योजनेची माहिती तुम्ही देता फोटो मात्र या दाढीवाल्यांचे लागतात : आपलं सरकार पुन्हा आणा मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देणार, असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं. "जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून खेचून आणू, तुमची एकजूट पाहता हे महायुती सरकार गेल्यात जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात. लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचं काम करता. तरी या योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात," असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी लागवलाय.

हेही वाचा :

  1. 'महाराष्ट्र वाट पाहतोय साहेब या दिवसाची' उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर - Uddhav Thackeray
  2. तर जनतेचा उद्रेक होणारच, महाराष्ट्र बंद राजकीय नाही : उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, महाराष्ट्र बंदची हाक - Uddhav Thackeray On Badlapur Case
  3. दिल्लीत लोटांगण घालण्याची टीका करणारे ताल कटोरा मैदानात कशाला गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल - Eknath Shinde On Uddhav Thackeray

Last Updated : Sep 15, 2024, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.