ETV Bharat / state

मध्यप्रदेशातून पिंपरीत आणलेली 7 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त; पुणे परिसरात कोयत्यानंतर पिस्तूलचा होतोय प्रसार - Pimpri Chinchwad Crime News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 4:45 PM IST

Updated : Sep 15, 2024, 5:18 PM IST

Pimpri Chinchwad Crime News : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. तर दुसरीकडं शहरात बेकायदेशीरित्या पिस्तुलाची विक्री केली जात असल्याची घटना घडली आहे. एका टोळीनं मध्यप्रदेश मधून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी आणलेली 7 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Pimpri Crime News
पाच आरोपींना अटक (ETV BHARAT Reporter)

पिंपरी Pimpri Chinchwad Crime News : मध्यप्रदेश मधून पिस्तूल आणून त्याची शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं पर्दाफाश केला केला आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

अवैध शस्त्र कारवाई मोहीम : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितलं की, सणासुदीच्या दरम्यान पोलीस कमिशनर यांच्या आदेशावरून अवैध शस्त्र कारवाईबाबत मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये अधिक तपास केला असता, प्रदीप ऊर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय 28, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), सुरज अशोक शिवले (वय 24, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), नवल विरसिंग झामरे (वय 23, रा. पेरणे फाटा, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), कमलेश ऊर्फ डॅनी कानडे (वय 29, रा. भारतमाता चौक, मोशी, पुणे), पवन दत्तात्रय शेजवळ (वय 35, रा. नारायणगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (ETV BHARAT Reporter)

जिवंत काडतुसे जप्त : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सुरुवातीला तीन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन जप्त करण्यात आली. त्यानंतर तिघांकडं तपास करत आरोपी नवल झामरे हा मध्यप्रदेश राज्यातून पिस्तूल घेऊन येतो. तो पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्या पिस्तूलची विक्री करत असल्याचं निष्पन्न झालं.

15 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त : यामध्ये परराज्यातील मुख्य डीलर नवल झामरे याने कमलेश कानडे याच्या ओळखीने पवन शेजवळ याला पिस्तूल विकले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. तसेच झामरे याच्याकडून आणखी तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन, एक स्कॉर्पिओ कार असा एकूण 15 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी पवन शेजवळ याच्या विरोधात या अगोदर चोरी तसंच घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी कमलेश कानडे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

यांनी केली कारवाई : ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे एक) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, प्रविण कांबळे, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, अमर कदम, समिर रासकर, राहुल खारगे, औदुंबर रोंगे, तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा -

  1. सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश; तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूल सापडली - Salman Khan House Firing
  2. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, पिस्टलसह दहा जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक
  3. मुंबईत 8 पिस्तूलांसह 15 जिवंत काडतुसे जप्त, अटकेतील दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू

Last Updated : Sep 15, 2024, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.