मुंबई mhada lottery 2024 : आज हक्काचं घर घेण्याचं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) मुंबई मंडळाची आज सोडत जाहीर होत आहे. म्हाडानं 2024 मध्ये 2 हजार 30 घरांची लॉटरी जाहीर केली होती. त्याच लॉटरीचा निकाल आज मंगळवारी 8 ऑक्टोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जाहीर केला. या सोडतीचा निकाल मुंबई येथील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभाग्रहात सकाळी 10.30 वाजता जाहीर करण्यात आला असून या सोडतीत 1 लाख 13 हजार 542 अर्जदार सहभागी झाले होते.
म्हाडा सोडतीचा निकाल जाहीर : म्हाडानं 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत मुंबईतील 2 हजार 30 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवली, या सोडतीचा निकाल आज जाहीर झाला. तथापि, अर्जदारांसाठी म्हाडाची लॉटरी विजेती यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रकाशित केली जाईल.
1.13 लाखांहून अधिक अर्ज : म्हाडा लॉटरीसाठी 2024 1.13 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. परंतु त्यापैकी 1 लाख 13 हजार 811 लोकांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. परंतु यापैकी २६९ अर्ज अपात्र ठरले. त्यामुळं आता 1 लाख 13 हजार 242 अर्जदारांमधून विजेते घोषित करण्यात आले आहेत. म्हाडा लॉटरी 2024 च्या माध्यमातून गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, अंधेरी, अँटॉप हिल, जुहू, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई आणि इतर ठिकाणच्या घरांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली.
म्हाडाचा निकाल ऑनलाइन कुठं पाहणार? : तुम्ही म्हाडाचा लॉटरी निकाल ऑनलाइन पाहू शकता. अर्जदार म्हाडाच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवर देखील निकाल पाहू शकतात.
- म्हाडाची वेबसाइट लिंक : https://housing.mhada.gov.in
- म्हाडाचे निकाल YouTube वर लाइव्ह - https://www.youtube.com/live/9F6Kss347WI
हे वाचलंत का :