हैदराबाद MG Cyberster : गेल्या काही वर्षांपासून, भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या (EVs) मागणीत सातत्यानं वाढ होत आहे. ही मागणी लक्षात घेता, आघाडीची कार उत्पादक JSW MG Motor India आपली नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार MG Cyberster असेल. कंपनी जानेवारी 2025 मध्ये भारतात MG Cyberster लाँच करणार आहे. MG च्या आगामी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारच्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती घेऊया....
MG beats Tesla to launch it’s all electric roadster in India
— Psychic Monkey (@ben4gor) December 3, 2024
While Tesla is holding back it’s plan to launch their EV in India and Tesla’s own roadster still not in sight, MG's just rolled in with its cool kid, the Cyberster. It will be launched in India next January. Hey! look… pic.twitter.com/qtyc5KzH8K
रिटेल चॅनलची घोषणा : MG ची आगामी इलेक्ट्रिक कार कंपनीच्या प्रीमियम निवडक रिटेल चॅनलद्वारे विकली जाईल. JSW MG Motor India नं काही महिन्यांपूर्वी प्रिमीयम ऑफरसाठी MG Select नावाच्या एका नवीन रिटेल चॅनलची घोषणा केली होती. आगामी एमजी सायबरस्टर हे या प्रीमियम डीलरशिप साखळीद्वारे किरकोळ विक्री होणारं पहिलं उत्पादन असेल. कंपनीनं सर्वप्रथम 2023 गुडवुड फेस्टिवल ऑफ स्पीडमध्ये सायबरस्टरचं प्रदर्शन केलं होतं. आगामी इलेक्ट्रिक कारची लांबी 1,533 मिमी, रुंदी 1,912 मिमी आणि उंची 1,328 मिमी असेल आणि तिचा व्हीलबेस 2,689 मिमी असेल.
Une nouveauté chez MG, la Cyberster.
— Barras Timoteï (@BarrasTimotei) December 2, 2024
-510 chevaux
-725 newtons mètres
-443 km d’autonomie
Qu’en pensez vous ? pic.twitter.com/ITNENtlUpb
एका चार्जमध्ये 580 किमी धावेल : MG ची इलेक्ट्रिक स्पोर्टस्कार अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी आधीच उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 2 बॅटरी पॅक वापरण्यात आले आहेत. 64kWh बॅटरी असलेले मॉडेल एका चार्जवर 520 किमीची रेंज देऊ शकतं. 77kWh बॅटरी पॅक असलेलं मॉडेल सुमारे 580 किमीची रेंज देण्याचा दावा करतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे, की कंपनी भारतीय बाजारपेठेत ग्लोबल पॉवरट्रेन देखील सुरू ठेवू शकते.
हे वाचलंत का :