हैदराबाद New Swift CNG car launched : मारुती सुझुकीनं आपल्या नवीन स्विफ्टचं S-CNG मॉडेल लाँच केलं आहे. स्विफ्ट CNG ची 3 प्रकारांमध्ये एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे. तसंच कारचं मायलेज 32.85 किमी असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
सुझुकी स्विफ्ट सीएनजी किंमत, मायलेज : मारुती सुझुकीनं अखेरीस आपलं सीएनजी मॉडेल (स्विफ्ट एस-सीएनजी) लाँच केल्यानंतर 5 महिन्यांच्या आत नवीन स्विफ्ट अपडेटची ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी होती. ग्राहक नवीन स्विफ्टच्या सीएनजी प्रकाराची आतुरतेनं वाट पाहत होते. त्यामुळं ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनीनं 32.85 किमी/किलो मायलेजसह नविन फिचर असलेली स्विफ्ट एस-सीएनजी लॉंच केलीय. चला, तर नवीन मारुती स्विफ्ट एस-सीएनजीची किंमत आणि फिचरसह सर्व माहिती घेऊया.
नवीन स्विफ्ट CNG च्या सर्व प्रकारांच्या किमती :
मारुती सुझुकी स्विफ्टच्या VXi CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 19 हजार 500 रुपये आहे.
मारुती सुझुकी स्विफ्टच्या VXi (O) CNG प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 46 हजार 500 रुपये आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट व्हेरियंटच्या ZXi CNG प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 19 हजार 500 रुपये आहे.
नवीन स्विफ्ट सीएनजीची पॉवर आणि मायलेज : मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टमध्ये नवीन 1.2 लीटर जी-सीरीज ड्युअल VVT इंजिन आहे, जे 69.75 PS ची पॉवर आणि 101.8 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतं. स्विफ्ट सीएनजीच्या सर्व प्रकारांना 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं आणि या हॅचबॅकचं मायलेज 32.85 किमी/किलो पर्यंत आहे, असं कंपनींचं म्हणणे आहे.
स्विफ्ट एस-सीएनजीची वैशिष्ट्ये : नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट एस-सीएनजी केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर कंपनीनं त्यात अनेक फीचर्सही दिले आहेत. नवीन स्विफ्ट सीएनजीमध्ये 7-इंचाची स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, सुझुकी कनेक्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रीअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, 60:40 स्प्लिट रीअर सीट्स, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक यासह सर्व मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत.
'हे' वाचलंत का :