ETV Bharat / technology

राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार मोफत; पात्रता, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही - Mukhyamantri Annapurna Yojana - MUKHYAMANTRI ANNAPURNA YOJANA

Mukhyamantri Annapurna Yojana : आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेशी संबंधित सर्व माहिती देखील देणार आहोत. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? त्याची पात्रता आणि निकष काय आहेत? इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana
महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 10:54 PM IST

Mukhyamantri Annapurna Yojana : विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा' योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटूंबांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार. ज्यांच्याकडं स्वतःचा गॅस नाही, अशा नागरिकांना मदत करण्यासाठी सरकानं ही योजना आणली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा का?, यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज कसा करावा लागेल? पात्रतेच्या अटी काय आहेत? जाणून घेऊया या बातमीतून...

तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार : महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 ही केवळ राज्यस्तरीय योजना आहे. सरकारनं ST, SC, EWS उमेदवारांसाठी ही योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार. देशभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं राज्य सरकार गरीब जनतेला मदत करण्यासाठी मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे.

या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब लोकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवणं आहे. यासोबतच प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही पात्रता निकषांचं पालन करून या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

पात्रता निकष

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे.
  • अर्जदार हा SC, SC, EWS श्रेणीतील असावा.
  • लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
  • केवळ पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रं असावीत.

आवश्यक कागदपत्रं.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • शिधापत्रिका
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर (आधार कार्डशी लिंक केलेला)
  • ईमेल आयडी

योजनेचा लाभ

  • अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळतील.
  • पात्र कुटुंबांना मोफत LPG गॅस सिलिंडरचा लाभ घेता येईल.
  • या योजनेतून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • एलपीजी गॅस सिलिंडर वापरल्यानं स्वयंपाक करण्यास उशीर होणार नाही.
  • तसंच स्वयंपाकासाठी लाकूड वापरावं लागणार नाही.

अर्ज कसा करावा.

  • सर्वप्रथम, महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटच्या होम पेजवर टॉप बारमध्ये रजिस्टर ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर स्क्रीन क्लिकवर नोंदणी फॉर्म दिसेल.
  • यानंतर तुमचा संपूर्ण तपशील जसं की कुटुंबातील सदस्यांचे नाव पत्ता इ भरा.
  • यानंतर योजनेशी संबंधित इतर कागदपत्रं अपलोड करा. (उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र इ.)
  • शेवटी, सर्व तपशील योग्यरित्या भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्हीची महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

हेही वाचा

  1. आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीं'चा तिसरा हप्ता 'या' दिवशी येणार - Ladki Bahin Yojana
  2. मुदत संपूनही 'या' तारखेपर्यंत भरता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज, पण पैसे किती मिळणार? - majhi ladki bahin yojana
  3. मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.