हैदराबाद RRB JE Admit Card 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड लवकरच RRB JE प्रवेशपत्र 2024 जारी करण्याच्या शक्यता आहे. त्यानंतर RRB कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार rrb.digialm.com वरून त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
संगणक आधारित चाचणी : रेलवे भर्ती बोर्ड (RRB) ऑनलाइन परीक्षेसाठी संगणक आधारित चाचणी (CBT) 16, 17 आणि 18 डिसेंबर, 2024 निर्धारित आहे. यात कनिष्ठ अभियंता (जेई), डिपो मॅटेरियल सुपरिंटंडेंट (डीएमएस), आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टेंट (सीएमए) सहित विविध अभियांत्रिकी पदांवर एकूण 7 हजार 951 जागांवर पदभरती होणार आहे.
RRB JE हॉल तिकीट कधी रिलीज होणार? : ही परीक्षा 16 डिसेंबर, 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे. उमेदवार त्यांचे हॉल तिकीट रेल्वे भर्ती बोर्डाच्या (RRB) अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमची लॉगिन आवश्यक असेल.
RRB JE ऍडमिट कार्ड 2024 कसं डाउनलोड करावं? :
RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) जेई (कनिष्ठ अभियंता) प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी खालील प्रक्रियेचं पालन करावं.
पायरी 1: RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी 2: होमपेजवर प्रवेशपत्र डाउनलोड लिंक शोधा.
पायरी 2: त्यानंतर "JE Admit Card 2024" किंवा "Download Admit Card" ही लिंक शोधा.
पायरी 3: लॉगिन तपशील टाका. लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचं लॉगिन तपाशील द्यावे लागतील. त्यात नोंदणी क्रमांक पासवर्ड/जन्मतारीखेचा समावेश असेल.
पायरी 4 : लॉगिन केल्यानंतर, तुमचं प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते प्रवेशपत्र डाउनलोड करा. त्यातील सर्व तपशील तपासा, जसं, नाव, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, सर्व माहिती योग्य असल्यास, "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
पायरी 5 : प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि ओळखपत्र, (आधार कार्ड) घेऊन जाणं आवश्यक आहे.
हे वाचलंत का :